मुंबई: (Suvendu Adhikari PA Murder Case) सुवेंदू अधिकारी यांच्या वैयक्तिक सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांच्या हत्याकांडात पश्चिम बंगाल पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातून तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, या संपूर्ण कटाचा उलगडा एका UPI पेमेंट आणि CCTV फुटेजमुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.(Suvendu Adhikari PA Murder Case)
बिहार आणि यूपीमधून ३ संशयित अटकेत
पोलिसांनी बिहारमधील बक्सर येथून मयंक राज मिश्राआणि विकी मौर्य यांना अटक केली. तर उत्तर प्रदेशातील अयोध्येतून राज सिंग याला ताब्यात घेण्यात आले. सोमवारी तिन्ही आरोपींना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. पोलिसांना संशय आहे की राज सिंह हा व्यावसायिक शार्पशूटर असू शकतो.(Suvendu Adhikari PA Murder Case)
UPI पेमेंट आणि CCTV फुटेज ठरले मोठे पुरावे
तपासादरम्यान पोलिसांना सर्वात मोठा धागा टोल प्लाझावर करण्यात आलेल्या UPI पेमेंटमधून मिळाला. प्राथमिक तपासात समोर आले की, हत्या होण्यापूर्वी आरोपींची कार बाली टोल प्लाझावरून गेली होती.
यावेळी कारमधील एका व्यक्तीने ऑनलाइन UPI व्यवहाराद्वारे टोल भरला होता. त्या व्यवहाराशी संबंधित मोबाइल नंबरच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर CCTV फुटेजमधून वाहनांची हालचाल आणि संशयितांची ओळख पटवण्यात आली.(Suvendu Adhikari PA Murder Case)
६ मे रोजी मध्यमग्राममध्ये गोळ्या झाडून हत्या
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, ६ मे रोजी रात्री मध्यमग्राम येथे ४२ वर्षीय चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली होती.
चंद्रनाथ हे कोलकात्यातून त्यांच्या मध्यमग्राम येथील घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांची स्कॉर्पिओ कार अडवली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या वाहनावर अनेक राउंड फायरिंग केली. या हल्ल्यात चंद्रनाथ यांच्या छाती आणि पोटात तीन गोळ्या लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.(Suvendu Adhikari PA Murder Case)
तपास यंत्रणांच्या मते, या संपूर्ण कटात किमान ८ जण सहभागी होते. आरोपींनी अनेक दिवस रेकी करून चंद्रनाथ यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.
पोलिसांच्या मते, हल्लेखोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी आणि हालचाली गुप्त ठेवण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या. तपास यंत्रणा आता आर्थिक व्यवहार, फंडिंग आणि इतर संभाव्य आरोपींची भूमिकाही तपासत आहेत.(Suvendu Adhikari PA Murder Case)
लाल कार आणि बाइकवरून आरोपी फरार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंद्रनाथ यांच्या स्कॉर्पिओला सिल्वर रंगाच्या निसान मायक्रा कारने अडवले होते. त्यानंतर बाइकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला.
हत्या केल्यानंतर आरोपींनी मायक्रा कार घटनास्थळीच सोडली आणि लाल रंगाच्या कार व मोटरसायकलवरून फरार झाले. CCTV फुटेजमध्ये ही लाल कार टोल प्लाझावर दिसून आली होती.(Suvendu Adhikari PA Murder Case)
फर्जी नंबर प्लेट आणि आधुनिक शस्त्रांचा वापर
पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या वाहनांवरील नंबर प्लेट बनावट असल्याचे उघड झाले. कारच्या चेसिस आणि इंजिन नंबरमध्येही छेडछाड करण्यात आली होती. याशिवाय, हल्ल्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकलींपैकी एक बाइक घटनास्थळापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर एका चहाच्या दुकानाजवळ सापडली. त्या बाइकवरही बनावट नंबर प्लेट होती.
तपासात समोर आले की, हल्लेखोरांनी आधुनिक Glock 47X पिस्तुलाचा वापर केला होता. अशा प्रकारची शस्त्रे सामान्य गुन्हेगार वापरत नाहीत. त्यामुळे या हत्येमागे व्यावसायिक सुपारी किलर्सचा सहभाग असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.(Suvendu Adhikari PA Murder Case)
कुख्यात गुन्हेगार विशाल श्रीवास्तवची चौकशी
पश्चिम बंगाल STF ने बिहारमधील गुन्हेगार विशाल श्रीवास्तव याचीही चौकशी केली. विशालवर हत्या, लूट आणि आर्म्स अॅक्टसह २२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र, चौकशीत त्याचा या हत्याकांडाशी थेट संबंध आढळून न आल्याने त्याला सोडून देण्यात आले.(Suvendu Adhikari PA Murder Case)
राज सिंहचे राजकीय कनेक्शन समोर
अयोध्येतून अटक करण्यात आलेला राज सिंह हा बलियाचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तो राजकारणात येण्याची तयारी करत होता आणि ब्लॉक प्रमुख निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
त्याचे काही पोस्टरही पोलिसांच्या हाती लागले आहेत, ज्यामध्ये त्याने स्वतःला अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा प्रदेश महासचिव म्हटले आहे. त्याच्या फेसबुक खात्यावर मंत्री दयाशंकर सिंह यांच्यासोबतचे फोटो आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यासोबतच्या रील्सही आढळल्या आहेत.(Suvendu Adhikari PA Murder Case)
चंद्रनाथ रथ कोलकात्यातून त्यांच्या मध्यमग्राम येथील भाड्याच्या घराकडे स्कॉर्पिओने निघाले होते. ड्रायव्हर वाहन चालवत होता, तर चंद्रनाथ पुढील सीटवर बसले होते.
रात्री १० वाजता – CCTV मध्ये स्कॉर्पिओ दिसली
मध्यमग्राममधील एका CCTV कॅमेऱ्यात रात्री ९:५८ वाजता त्यांची स्कॉर्पिओ दिसली. त्यानंतर एक कार आणि दोन बाइक त्यांचा पाठलाग करताना आढळल्या.
रात्री १०:३० वाजता – कारने रस्ता अडवला
दोहरिया जंक्शनजवळ आरोपींच्या कारने स्कॉर्पिओला ओव्हरटेक करून रस्ता रोखला.
गोळीबार झाला
बाइकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक ६ ते १० राउंड फायरिंग केली.
आरोपी फरार
वारदातीनंतर आरोपींनी कार तिथेच सोडली आणि दोन वेगवेगळ्या दिशांनी बाइकवरून पळ काढला.
सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी
चंद्रनाथ रथ पूर्वी एअरफोर्समध्ये अधिकारी होते. VRS घेतल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काही काळ काम केले आणि नंतर राजकारणात प्रवेश केला. सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये असतानापासून चंद्रनाथ त्यांच्यासोबत काम करत होते. २०१९ मध्ये ते सुवेंदू यांच्या अधिकृत टीमचा भाग बनले. भवानीपूर निवडणूक प्रचाराची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.
त्यांची आई हाशी रथ देखील पूर्वी TMC मध्ये होत्या, मात्र २०२० मध्ये त्या सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झाल्या.(Suvendu Adhikari PA Murder Case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.