बारामती : (Congress vs Parth Pawar) बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पार्थ पवार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. काँग्रेसने पार्थ पवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अत्यंत जहरी शब्दांत टीका केली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करत पार्थ पवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला होता. त्याचवेळी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केल्यामुळे “हा काँग्रेसचा डाऊनफॉल आहे” असा दावा पार्थ पवार यांनी केला होता. (Congress vs Parth Pawar)
काँग्रेसचं प्रत्युत्तर काय?
या टीकेला उत्तर देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सोशल मीडियावरून थेट हल्ला चढवला. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटमध्ये पार्थ पवारांवर वैयक्तिक टीका करण्यात आली असून, “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं जरा जास्तच नाही का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर शांत राहणारा, महाशक्तीसमोर सरेंडर झालेला हा कृतघ्न मुलगा काँग्रेसबद्दल बोलू नये,” असा घणाघात काँग्रेसने केला आहे. (Congress vs Parth Pawar)
या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे? (Congress vs Parth Pawar)
धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ?
स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत…
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 6, 2026
दरम्यान, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतही मतभेद उघड झाले असल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरीमुळे बारामतीतील निवडणूक आणखी चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पार्थ पवार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress vs Parth Pawar)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.