मुंबई : (US-Iran War) "अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेसोबत करार करुन तडजोड न केल्यास पाषाणयुगात पाठवू", असा धमकी वजा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ६ एप्रिल रोजी दिला. त्यांच्या धमकीला इराणने 'जशास तसे' उत्तर दिले आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद-बाघेर गालिबाफ यांचे वरिष्ठ सल्लागार महदी मोहम्मदी यांनी ट्रम्प यांना २० तासांच्या आत आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे.(US-Iran War)
महदी मोहम्मदी यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "खरी परिस्थिती अशी आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आत्मसमर्पण करण्यासाठी २० तासांचा वेळ आहे. अन्यथा इराण अमेरिकेसह त्यांच्या साथीदारांनी अश्मयुगात पाठवेल, इराणने हे युद्ध जिंकले आहे आणि आम्ही फक्त स्वतःच्या अटींवरच करार स्वीकारणार, माघार घेणार नाही." अशाप्रकारे ट्रम्प यांच्या धमकीला इराणने त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.(US-Iran War)
मंगळवारची रात्र इराणसाठी काळरात्र ठरणार का?
अमेरिकेने ठेवलेला प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे. यानंतर संतप्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम देत मंगळवारी रात्रीपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ दिली आहे. दोन्ही देशातील संघर्ष तीव्र झाला असताना राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषकाने केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.(US-Iran War)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\