US-Iran War: इराणसाठी आजची 'रात्र वैऱ्याची'! डोनाल्ड ट्रम्प यांचा अंतिम इशारा; म्हणाले, "संपूर्ण इराण..."

    07-Apr-2026   
Total Views |

US-Iran War



मुंबई : (US-Iran War)
गेल्या काही आठवड्यांपासून धगधगत असलेल्या इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक विधान केले आहे. “संपूर्ण इराण देश एका रात्रीत नष्ट केला जाऊ शकतो, आणि ती रात्र उद्याचीही असू शकते,” असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.(US-Iran War)
 
 
...तर एका रात्रीत इराण नष्ट करू
 

व्हाईट हाऊसमध्ये बोलताना इराण दिलेल्या मुदतीपूर्वी अमेरिकेसोबत करार करण्यास अपयशी ठरला, तर कारवाई उद्या म्हणजे ७ एप्रिलच्या रात्रीही होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, "संपूर्ण देश एका रात्रीत संपवता येऊ शकतो, आणि ती रात्र कदाचित उद्याची असू शकते. मला आशा आहे की मला असे पाऊल उचलावे लागणार नाही. मग त्यांच्याकडे एकही पूल शिल्लक राहणार नाही, एकही वीज प्रकल्प उरणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.(US-Iran War)



अण्वस्त्र बाळगणे हा युद्ध गुन्हा


पुढे पत्रकारांनी विचारले की, इराणच्या नागरी वीज प्रकल्पांवर हल्ला करणं हा 'युद्ध गुन्ह्या'चा भाग ठरेल का, तेव्हा ट्रम्प यांनी तो दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, "मला त्याची काळजी नाही. तुम्हाला माहित आहे युद्ध गुन्हा काय असतो? अण्वस्त्र बाळगणे हा युद्ध गुन्हा आहे."(US-Iran War)


गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांनी इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता ठेवते. इराणला दिलेला १० दिवसांची अंतिम मुदत संपत असतानाच, ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ वाजताची (ईस्टर्न टाइम) डेडलाईन निश्चित केली आहे. जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर भीषण बॉम्बफेक केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. (US-Iran War)



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\