Artemis-2 : आर्टेमिस-२ ने मोडला ५६ वर्षांचा विक्रम! नासाच्या ओरियन यानाने गाठलं सर्वाधिक अंतर

    07-Apr-2026   
Total Views |

Artemis-2


मुंबई : (Artemis-2)
नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेअंतर्गत ‘ओरियन’ हे अंतराळयान सध्या चंद्राच्या मागील बाजूने प्रवास करत असून, या मोहिमेत मानवाने पृथ्वीपासून सर्वाधिक अंतर गाठण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.(Artemis-2)


या अंतराळयानामध्ये चार अंतराळवीर असून त्यांनी सुमारे २ लाख ५२ हजार ७५२ मैलांचा (४,०६,७७१ किमी) टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी १९७० मधील अपोलो १३ मोहिमेदरम्यान २ लाख ४८ हजार ६५५ मैलांचा (४,००,१७१ किमी) विक्रम नोंदवला गेला होता, जो आता मोडीत निघाला आहे. या नव्या विक्रमाची नोंद भारतीय प्रमाण वेळेनुसार काल रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी करण्यात आली.(Artemis-2)



नासाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंतराळवीरांचा चमू चंद्राच्या मागील भागाचा सखोल अभ्यास करत आहे. ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असून चंद्राच्या पृष्ठभागावर तपकिरी आणि निळ्या रंगांच्या नव्या छटा आढळल्या आहेत. या निरीक्षणांमुळे चंद्राच्या इतिहासाबाबत नवी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.(Artemis-2)


चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणार परतीचा प्रवास


आता यान चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर पडून पुन्हा पृथ्वीकडे आपला प्रवास सुरू करेल. आर्टेमिस II चा मार्ग बऱ्याच अंशी १९७० च्या अपोलो-१३ मिशनसारखा आहे. हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर 'बेचकी' प्रमाणे करेल, जे यानाला परत पृथ्वीकडे ढकलून देईल. संपूर्ण मोहिमेत चारही अंतराळवीर सुमारे ११.०२ लाख किमीचा प्रवास करतील.(Artemis-2)



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\