मुंबई : (Dharavi health) जागतिक आरोग्यदिनानिमित्त जगभरात अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, नव्या उपचारपद्धती आणि दर्जेदार आरोग्य सेवांवर सकारात्मक चर्चा होत असताना,आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टींपैकी एक असलेल्या धारावीत मात्र आजही आरोग्याचा प्रश्न मूलभूत सुविधांभोवती फिरताना दिसतो. दूषित पाणी, अस्वच्छता, प्रदूषित हवा आणि कोंदट राहणीमान हेच इथल्या आरोग्याचे वास्तव आहे.(Dharavi health)
एका सर्वेक्षणानुसार, धारावीतील रहिवाशांचे सरासरी आयुर्मान सुमारे ६० वर्षे असून ते इतर मुंबईकर आणि देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. काही अतिप्रदूषित भागांमध्ये हा आकडा आणखी घटलेला दिसतो. धारावीतील बहुतांश कुटुंबे लहान आणि कोंदट घरांमध्ये राहतात. अनेक ठिकाणी शुद्ध पाणी, पुरेशी हवा आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने कर्करोग, जलजन्य आजार, श्वसनविकार आणि त्वचारोग यांसारख्या समस्या वाढीस लागतात. विशेष म्हणजे, कमी वयातच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दीर्घकालीन श्वसनविकारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसते.(Dharavi health)
स्थानिक डॉक्टर आणि रेश्मा नर्सिंग होमचे संचालक डॉ. फुरकान शेख सांगतात, “प्रदूषित हवा, स्वच्छतेचा अभाव, अशुद्ध पाणी आणि सततचा मानसिक ताण या सर्वांचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होतो. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास आयुर्मान घटणे अपरिहार्य ठरते.”(Dharavi health)
या पार्श्वभूमीवर,(Dharavi) धारावी सोशल मिशन या संस्थेने आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिला आणि लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रतपासणी, तसेच ‘आयुष्मान भारत’सारख्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. या उपक्रमांमुळे आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून, वेळेवर निदान आणि उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, धारावीकरांचे आयुर्मान वाढवण्यासाठी केवळ वैद्यकीय सुविधा पुरेशा नाहीत. हवेशीर घरे, स्वच्छ परिसर, शुद्ध पाणी, मोकळ्या जागा आणि दर्जेदार मूलभूत सुविधा या गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत.(धारावी)
स्थानिकांच्या प्रतिक्रिया
“अपुरे आणि अशुद्ध पाणी, प्रदूषित हवा आणि दाटीवाटीची वस्ती हा आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. आम्ही वारंवार आजारी पडतो आणि त्यामागे परिसरच कारणीभूत असल्याचे डॉक्टर सांगतात.”
- फरीद खान, स्थानिक रहिवासी(Dharavi health)
“इथे दिवसेंदिवस श्वास घेणे सुद्धा कठीण होत चालले आहे. शेजाऱ्यांना सतत खोकला असतो. अशा प्रदूषित वातावरणात निरोगी राहण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो.”
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.