नाशिक : (Ashok Kharat case) नाशिकमधील भोंदू खरात प्रकरण दिवसेंदिवस तापत चालले असून, त्यातून अनेक काळे कारनामे बाहेर येत आहेत. आतापर्यंत खरात विरोधात महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच काही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यातच आता सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने सोलापूरमधील कार्यक्रमादरम्यान या प्रकरणावर कडक प्रतिक्रिया देत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Ashok Kharat case)
गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?
सोलापूरच्या खंडोबाची वाडी येथील नृत्य कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलने माध्यमांशी बोलताना म्हटले की, "अशा भोंदूगिरीवर योग्य आणि कडक कारवाई व्हावी, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडू नयेत." यासोबतच, तिने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. (Ashok Kharat case)
आतापर्यंत या सर्व प्रकरणाचा तपास आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी करत होती. त्यांच्या चौकशीत खरातची १० तास कसून चौकशी करण्यात आली. त्याशिवाय त्याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाची पिडीत महिलांसह तपासणी देखील करण्यात आली. दरम्यान, पोलीसांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करून आणखी पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे गुन्ह्यांची संख्या आणखी वाढत गेली. (Ashok Kharat case)
दरम्यान, आता या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ED) मार्फतही चौकशी सुरू झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती आणि पैशांच्या व्यवहारांचा तपास ईडीकडून केला जाणार आहे. या प्रकरणात कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) लीक झाल्याचा मुद्दाही समोर आला आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “CDR मिळवण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांना आहे. तो लीक कसा झाला, याची स्वतंत्र चौकशी केली जाईल.” (Ashok Kharat case)
सरकारकडून अशोक खरातची संपत्ती, आर्थिक व्यवहार आणि महिलांवरील अत्याचाराच्या सर्व प्रकरणांचा खोलात जाऊन तपास केला जात आहे. “त्याला कडक शिक्षा मिळेल, यावर महाराष्ट्रातील सर्वांचे एकमत आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत फडणवीस म्हणाले, “आम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले काम करत आहोत.” (Ashok Kharat case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.