
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर पोस्ट करत इराणच्या भूमिकेवर टीका केली. “इराणला स्वतःला सावरता येत नाहीये. अण्वस्त्रांव्यतिरिक्त इतर कोणताही करार कसा करायचा हे त्यांना माहीत नाही. त्यांनी लवकरात लवकर शहाणे व्हायला हवे,” असे त्यांनी लिहिले.(Donald Trump)
या पोस्टसोबत ट्रम्प यांच्या हातात असॉल्ट रायफल असल्याचा एक संपादित फोटोही प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामुळे या वक्तव्याला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले.(Donald Trump)
President Trump posts on Truth Social: Iran can’t get their act together. They don’t know how to sign a nonnuclear deal.
— Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) April 29, 2026
They better get smart soon! President DJT pic.twitter.com/tFEwmalvrD
ट्रम्प यांनी यापूर्वी इराण ‘कोलमडण्याच्या अवस्थेत’ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांनी ही पोस्ट करत, इराणला शक्य तितक्या लवकर होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याची गरज असल्याचे सांगितले. “त्यांना त्यांच्या नेतृत्वाची परिस्थिती समजून घ्यायची आहे आणि मला वाटते ते हे करू शकतील,” असेही त्यांनी नमूद केले.(Donald Trump)
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पाकिस्तानात पोहोचले असताना ट्रम्प यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आणि लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्याशी चर्चा केली.(Donald Trump)
सुरुवातीला ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स चर्चेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. तसेच विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्यावर पुढील फेरीची जबाबदारी सोपवली जाईल, असेही त्यांनी संकेत दिले होते.(Donald Trump)
मात्र, नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, कोणतेही शिष्टमंडळ पाकिस्तानात पाठवले जाणार नाही. “त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही आणि अशा परिस्थितीत दौरा करणे म्हणजे केवळ खर्चिक ठरेल,” असे त्यांनी सांगितले.(Donald Trump)