Raghav Chadha : “मी योग्य व्यक्ती होतो, पण चुकीच्या पक्षात होतो” १० लाख फॉलोअर्स घसरल्यानंतर राघव चड्ढांचा स्फोटक खुलासा; भाजपमध्ये जाण्याचं खरं कारण समोर...

Total Views |
Raghav Chadha
 
मुंबई : (Raghav Chadha) आम आदमी पार्टी (आप) सोडून भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये प्रवेश केल्यानंतर सतत होत असलेल्या प्रश्नांच्या भडीमारावर राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी अखेर मौन सोडले आहे. सोमवारी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका प्रांजळ व्हिडिओद्वारे त्यांनी आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करत पक्षावर गंभीर टीका केली.(Raghav Chadha)
 
गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवरून काही काळ दूर गेल्यानंतर चड्ढा यांनी एकाच दिवसात सुमारे दहा लाख फॉलोअर्स गमावले होते. या पार्श्वभूमीवर गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी पुन्हा सोशल मीडियाचा आधार घेतला. आजच्या घडीला इंस्टाग्राम हे विशेषतः ‘जनरेशन Z’ मतदारांमध्ये राजकीय लोकप्रियतेचे महत्त्वाचे माध्यम मानले जाते.(Raghav Chadha)
 
आपल्या व्हिडिओमध्ये चड्ढा यांनी स्पष्ट केले की, ते ज्या ‘आप’मध्ये सामील झाले होते, तो पक्ष आता पूर्णपणे बदलला आहे. “आज हा पक्ष जुना राहिलेला नाही. पक्षातील कामाचे वातावरण विषारी झाले आहे. काम करण्यास आणि संसदेत बोलण्यासही अडथळे निर्माण केले जातात,” अशी टीका त्यांनी केली.(Raghav Chadha)
 
चड्ढा यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आयुष्यातील १५ वर्षे ‘आप’ला दिली असून ते स्वतःला पक्षाचा संस्थापक सदस्य मानतात. “मी राजकारणात करिअरसाठी आलो नव्हतो. मी माझ्या तारुण्याची १५ वर्षे रक्त, घाम आणि मेहनतीने या पक्षाला दिली,” असे त्यांनी भावनिक शब्दांत म्हटले.(Raghav Chadha)
 
भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना पक्षात परकेपणा जाणवू लागला होता. “मी योग्य व्यक्ती होतो, पण चुकीच्या पक्षात होतो,” असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी राजकारण सोडणे, पक्षात बदल घडवून आणणे किंवा दुसऱ्या व्यासपीठावर जाणे असे अनेक पर्याय विचारात घेतले होते. अखेरीस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.(Raghav Chadha)
 
 
२४ एप्रिल रोजी चड्ढा यांच्यासह ‘आप’चे इतर सहा राज्यसभा खासदार अशोक कुमार मित्तल, हरभजन सिंग, संदीप कुमार पाठक, विक्रमजीत सिंग सहानी, स्वाती मालीवाल आणि राजिंदर गुप्ता यांनीही पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या हे सर्व खासदार भाजपच्या राज्यसभेतील संख्याबळाचा भाग बनले आहेत.(Raghav Chadha)
 
आपल्या निर्णयाचे समर्थन करताना चड्ढा म्हणाले की, “एक-दोन लोक चुकू शकतात, पण सात लोक एकाच वेळी चुकीचा निर्णय घेतील असे होऊ शकत नाही.” त्यांनी दबाव किंवा भीतीमुळे पक्ष सोडल्याच्या आरोपांनाही फेटाळून लावत, “हा निर्णय भीतीमुळे नाही, तर निराशा, भ्रमनिरास आणि तिरस्कारामुळे घेतला आहे,” असे स्पष्ट केले.(Raghav Chadha)
 
तसेच, ‘आप’ सोडण्याचा अर्थ सार्वजनिक जीवनातून माघार घेणे नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मी अधिक ऊर्जा आणि उत्साहाने जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत राहीन,” असेही त्यांनी नमूद केले.(Raghav Chadha)
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com