Auto Drivers Marathi Rule: टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठा दिलासा! मराठी सक्तीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती...

Total Views |
 
Auto Drivers Marathi Rule
 
मुंबई: (Auto Drivers Marathi Rule) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादात आता मोठी घडामोड समोर आली आहे. मंत्रालयातील परिवहन विभागात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. २७ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Auto Drivers Marathi Rule)
 
कामगार दिवस म्हणजेच १ मे २०२६ पासून हा नियम लागू होणार होता. मात्र, आता या तारखेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्याची सक्ती केली जाणार नाही, असं स्पष्ट होत आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता काही प्रमाणात कमी झाली आहे. मराठी भाषा येत नसल्यास रिक्षाचालकांचे परमिट किंवा लायसन्स रद्द होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, परिवहन विभागाने या बाबत महत्त्वाची स्पष्टता दिली आहे. सध्या कोणत्याही चालकाचे परमिट किंवा लायसन्स रद्द केले जाणार नाही. (Auto Drivers Marathi Rule)
 
१५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ?
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कोणतीही कठोर कारवाई होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. “याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Auto Drivers Marathi Rule)
 
मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय हा स्थानिक भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी घेतल्याचं सरकारचं म्हणणं असलं, तरी त्यावर विरोधही मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः इतर राज्यांतून आलेल्या चालकांनी या नियमाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. आता सरकार अंतिम निर्णय काय घेणार, आणि १५ ऑगस्टनंतर सक्ती लागू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Auto Drivers Marathi Rule)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com