Devendra Fadnavis

मुंबई : (Devendra Fadnavis) "श्याम मानव कोण आहेत सांगणारे यांना कोणी अधिकार दिला आहे. ते थोडीच प्रमाणपत्र वाटणारे आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळात फक्त प्रसिद्धीकरिता बोलतात. त्यांना कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांना प्रसिद्धी हवी आहे त्यासाठी ते रोज असे वक्तव्य करत असतात." असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर येथे रविवार दि.२६ रोजी केले आहे. अंनिसचे श्याम मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केल्यानंतर त्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
हेही वाचा : Maharashtra Transport Rules : व्यवहार्य मराठी भाषा सक्ती संदर्भात दि.२७ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलवली बैठक
"अमरीश पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूरने जो विकास केलेला आहे. तो अतिशय पथदर्शी आहे. इथले आमदार काशीरामजी पावरा यांनी देखील लोकांमध्ये अत्यंत चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. आणि आज ज्या प्रकारे शिक्षणाचे केंद्र म्हणून शिरपूर तयार झालेल आहे. देशातले हे एक मॉडेल आहे. यापूर्वी जलसंधारणाच मॉडेल असलेले शिरपूर आता शिक्षणाचे मॉडेल झाले आहे." असेही फडणवीस म्हणाले.