Maharashtra Transport Rules : व्यवहार्य मराठी भाषा सक्ती संदर्भात दि.२७ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलवली बैठक
26-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Maharashtra Transport Rules) व्यावसायिक प्रवासी वाहन चालविणाऱ्या चालकांना व्यवहार्य मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि व संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवार दि. २७ रोजी मंत्रालय येथील परिवहन मंत्री यांच्या दालनात बोलावली आहे. दुपारी १२.३० वाजता ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत मराठी भाषा शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करणार आहे तसेच अमराठी चालकांना व्यवहार्य मराठी ज्ञान आवश्यक आहे या विषयावर चर्चा केली जाईल. मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून अनेक वेळा प्रवासी आणि चालकांमध्ये मराठी भाषेमुळे वाद निर्माण होत असतात.याच पार्श्वभूमीवर सामाजिक समन्वय व सेवा गुणवत्तेसाठी हा निर्णय घेतल्याचे शासनाचे म्हणणे आहे. यामुळे चालक व प्रवासी यांच्यातील संवाद देखील सहज व सुलभ होण्यास मदत होईल.(Maharashtra Transport Rules)
याच विषयाच्या संदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी ऑटो व टॅक्सी चालकांची सभादेखील सोमवार दिनांक २७ रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल, गोरेगाव येथे शशांक राव यांच्यावतीने बोलवण्यात आली आहे.(Maharashtra Transport Rules)