_202604261558096717_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरातविरोधात तक्रार करणारा ललित पोफळे याने आपल्या विश्वासातील एका तरुणाला खरातच्या फार्महाऊसवर कुक म्हणून नोकरीला लावलं होतं. हा कुकच खरातच्या काळ्या कृत्यांचा ‘इनसाईड साक्षीदार’ ठरला. फार्महाऊसवर जेव्हा खरात महिलांना घेऊन येत असे, तेव्हा तो कुकला सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याचे आदेश देत असे. मात्र संशय न आणता कुकने हे कॅमेरे चालू ठेवले आणि त्यातूनच अनेक धक्कादायक दृश्ये रेकॉर्ड झाली. (Ashok Kharat Case)
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, खरात फार्महाऊसवर महिलांसोबत दारू पिणे, अश्लील कृत्ये करणे आणि दोन-दोन दिवस तिथे राहणे, हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या व्हिडीओंमुळे तपासाला ठोस दिशा मिळाली आहे. (Ashok Kharat Case)
ललित पोफळे हा एकेकाळी खरातचा अत्यंत विश्वासू सहकारी होता. मात्र तब्बल साडेआठ कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर पोफळेचा खरातवरील विश्वास उडाला आणि त्यानेच खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीच त्याने आपल्या मर्जीतील कुकला फार्महाऊसवर ठेवत, त्याचा पगारही स्वतः देण्याची तयारी दाखवली. या कुकच्या माध्यमातून खरातच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली. (Ashok Kharat Case)
दरम्यान, काही काळानंतर खरातला या कुकबाबत संशय आला होता. त्याने आपल्या चालकाद्वारे कुकला कामावरून काढून टाकण्याची सूचना दिली होती. मात्र तोपर्यंत पुरावे गोळा झाले होते. या व्हिडीओ पुराव्यांमुळे अशोक खरातविरोधातील केस अधिक मजबूत होत असून, त्याच्या इतर सहकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता आहे. तपास यंत्रणा आता या व्हिडीओंच्या आधारे संपूर्ण नेटवर्क उघड करण्याच्या तयारीत आहेत. (Ashok Kharat Case)