नाशिक : (Ashok Kharat Case Nashik) नाशिकचा बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली असून अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपले हात झटकले आहेत. आपला पती अशोक खरात याने केलेल्या गुन्ह्यांमध्ये आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. तसेच आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरात हिने न्यायालयात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याचे पाय आणखी खोलात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(Ashok Kharat Case Nashik)
अशोक खरात याला अटक होताच दि. ३१ मार्चपासून त्याची पत्नी कल्पना खरात फरार आहे. नाशिक पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात असून अजूनही ती पोलिसांच्या तावडीत सापडलेली नाही. दरम्यान, कल्पना खरातकडून अटकपूर्व जामिनासाठी राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी सुनावणी पार पडली. कल्पना खरातची न्यायालयात तिचे वकील प्रशांत गिरी यांनी बाजू मांडली. त्यांनी कल्पना खरातची भूमिका मांडताना तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले.(Ashok Kharat Case Nashik)
पती अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. पती अशोक खरात याने गंभीर गुन्हे केल्याचेही कल्पना खरात यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कल्पना खरात हिचा जामीन अर्ज फेटाळला. अशोक खरात याने केलेल्या विविध गुन्ह्यांत कल्पना खरातची साथ होती. तिच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले असून तिच्या नावावर खरातची संपत्ती असल्याचे सांगण्यात आले होते.(Ashok Kharat Case Nashik)
पतीच सर्व खाती ऑपरेट करायचा
राहाता येथील न्यायालयात कल्पना खरात हिची बाजू मांडताना तिचे वकील प्रशांत गिरी यांनी अशोक खरात प्रकरणात कसलाही सहभाग नसल्याचा दावा केला. तसेच कल्पना खरातची सर्व बँक खाती पती अशोक खरातच ऑपरेट करायचा, असा युक्तिवाद गिरी यांनी केला.(Ashok Kharat Case Nashik)
दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.