नाशिक : (Nashik TCS case) आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस मधील कथित लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाने कॉर्पोरेट जगतात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानली जाणारी एचआर अधिकारी निदा खान अद्याप फरार असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत आहे. (Nashik TCS case)
दरम्यान, या प्रकरणात पीडित महिलांनी दिलेल्या जबाबातून धक्कादायक आणि संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. पीडितेच्या मते, आरोपी रजा मेनन आणि आसिफ अन्सारी हे सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. “तुझी फिगर झिरो आहे, गरज पडली तर कधीही बोलव,” अशा अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्या जात होत्या. इतकेच नव्हे तर गुढीपाडव्याच्या दिवशी साडीचा पदर ओढल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच ऑफिसमध्ये वारंवार जवळ येऊन बसणे, स्पर्श करणे, आणि अपमानास्पद भाषेत बोलणे अशा प्रकारांचा सामना करावा लागत असल्याचेही पीडितेने सांगितले. (Nashik TCS case)
याशिवाय, काही आरोपींनी धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने प्रश्न विचारत मानसिक दबाव आणल्याचेही समोर आले आहे. “तुमचा महादेव भगवान आहे का? गणेश महादेवाचा मुलगा आहे का?” असे प्रश्न विचारून त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. (Nashik TCS case)
या प्रकरणातील तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून महिलांवर लक्ष ठेवले जात होते आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्यांचा छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर ऑफिसमधील इंटरनेट पासवर्डदेखील अश्लील आणि धार्मिक भावना दुखावतील अशा शब्दांमध्ये ठेवले जात असल्याचे उघड झाले आहे. काही आरोपींनी मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास सुरू आहे. (Nashik TCS case)
एचआर निदा खान अद्याप फरार?
या संपूर्ण प्रकरणात एचआर अधिकारी निदा खानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे तपासात समोर आले आहे. ती मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम पाहत होती आणि मीटिंगच्या माध्यमातून काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याचे निर्देश देत असल्याचा संशय आहे. महिलांवर मानसिक दबाव टाकून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न तिच्या सांगण्यावरून होत असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. सध्या पोलिसांचे तीन विशेष पथक निदा खानच्या शोधात असून तिचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्यासाठी अटकेत असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेण्याची शक्यता आहे. या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Nashik TCS case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.