Mallikarjun Kharge Controversy : “खरगेंच्या एका वक्तव्याने खळबळ; मोदींवर ‘दहशतवादी’ आरोपानंतर देशभरात राजकीय संघर्ष तीव्र”

Total Views |
Mallikarjun Kharge Controversy
 
मुंबई : (Mallikarjun Kharge Controversy) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘दहशतवादी’ असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.(Mallikarjun Kharge Controversy)
 
खर्गे यांनी एआयएडीएमके-भाजप युतीवर निशाणा साधताना हा शब्द वापरला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “एआयएडीएमके मोदींसोबत कशी जाऊ शकते?” तसेच त्यांनी समानता आणि न्यायाच्या मुद्द्यावरही भाजपवर टीका केली. या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.(Mallikarjun Kharge Controversy)
भारतीय जनता पक्ष ने या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसने देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी, अशी मागणी करत हे वक्तव्य “लोकशाहीचा अपमान” असल्याचे म्हटले. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पक्षाची विचारसरणी उघड होत असल्याचे सांगितले.(Mallikarjun Kharge Controversy)
 
वाद वाढताच खर्गे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांनी पंतप्रधानांना थेट ‘दहशतवादी’ म्हटले नाही, तर “ते लोकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात,” या अर्थाने त्यांनी टिप्पणी केली होती. त्यांनी ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांच्या कथित वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले.(Mallikarjun Kharge Controversy)
 
दरम्यान, काँग्रेस-डीएमके आघाडीने आपल्या कल्याणकारी योजना, सर्वसमावेशक विकास आणि शिक्षण-आरोग्याच्या मुद्द्यांवर भर देत निवडणूक प्रचार सुरू ठेवला आहे. मात्र, खर्गे यांच्या वक्तव्यामुळे प्रचाराचा सूर अधिक आक्रमक झाला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.(Mallikarjun Kharge Controversy)
 
राजकीय विश्लेषकांच्या मते, या वादामुळे तामिळनाडू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. तसेच अशा वक्तव्यांमुळे मतदारांवरही परिणाम होऊ शकतो. आता निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना निर्माण झालेल्या या वादामुळे प्रचाराची दिशा नक्कीच बदलणार आहे.(Mallikarjun Kharge Controversy) 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com