मुंबई : (Sri Lanka Oil War) हिंद महासागरातील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या श्रीलंका मध्ये आता बंदरांपेक्षा ऊर्जा क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्याची शर्यत वेग घेत आहे. वीज आणि इंधन पुरवठ्यावर नियंत्रण मिळवणारा देश श्रीलंकेवर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करू शकतो, यामुळे चीन आणि भारत यांच्यात नवे ‘एनर्जी युद्ध’ सुरू झाल्याचे चित्र आहे.(Sri Lanka Oil War)
आतापर्यंत चीनने पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत बंदरे आणि वीज प्रकल्प उभारले होते. मात्र आता त्यांची रणनीती बदलली असून, ते थेट इंधनाच्या किरकोळ बाजारपेठेत उतरले आहेत. चिनी कंपनी सायनोपेक हंबनटोटामध्ये रिफायनरी उभारत असून, स्वतःच तेल तयार करून तेच आपल्या पेट्रोल पंपांद्वारे विकण्याचा त्यांचा स्पष्ट प्रयत्न आहे. यामुळे श्रीलंकेच्या संपूर्ण इंधन बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्याचा चीनचा उद्देश दिसून येतो.(Sri Lanka Oil War)
दुसरीकडे, भारतानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या काळात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता हे संबंध अधिक मजबूत करत भारत, United Arab Emirates सोबत मिळून थेट पाइपलाइन प्रकल्प उभारत आहे. या योजनेअंतर्गत भारतातील रिफायनरीतून श्रीलंकेतील त्रिंकोमाली पर्यंत मल्टी-प्रॉडक्ट पाइपलाइन टाकली जाणार आहे.(Sri Lanka Oil War)
या पाइपलाइनमुळे श्रीलंकेला २४ तास स्वस्त आणि स्थिर इंधन पुरवठा मिळणार असून, समुद्री मार्गावरील खर्च आणि धोके कमी होतील. त्यामुळे भारत केवळ मदत करणारा देश न राहता, श्रीलंकेचा दीर्घकालीन ऊर्जा भागीदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.(Sri Lanka Oil War)
या संपूर्ण घडामोडीत United Arab Emirates ची भूमिका निर्णायक ठरत आहे. त्रिंकोमाली येथे दुसऱ्या महायुद्धातील मोठा ऑइल टँक फार्म असून, भारत आणि UAE मिळून येथे जागतिक ऊर्जा केंद्र उभारण्याची योजना आखत आहेत. UAE कडून गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेतील अनुभव मिळणार असल्याने हा प्रकल्प चीनसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.(Sri Lanka Oil War)
दरम्यान, श्रीलंका दोन्ही बाजूंना संधी देत संतुलित धोरण अवलंबत आहे. एका बाजूला चीनला पेट्रोल पंप उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारत-UAE पाइपलाइनलाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. आर्थिक पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका दोन्ही देशांच्या गुंतवणुकीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.(Sri Lanka Oil War)
एकूणच, श्रीलंकेतील ऊर्जा क्षेत्रात सुरू झालेली ही स्पर्धा केवळ व्यावसायिक नाही, तर भू-राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पुढील काळात या ‘तेल युद्धा’चा परिणाम संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Sri Lanka Oil War)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.