Pune Heavy Rain : उन्हाळ्यातच पुण्यावर पावसाचा कहर; गारपीट आणि पाण्यात बुडाले रस्ते...

Total Views |
Pune Heavy Rain News

पुणे : (Pune Heavy Rain) भर उन्हाळ्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः धडक दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसाने आजही जोरदार हजेरी लावत शहरातील जनजीवन विस्कळीत केले. दुपारनंतर अचानक आकाश ढगांनी भरून गेले आणि काही वेळातच काळोख पसरला.(Pune Heavy Rain)
 
यानंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने पुणे शहर झोडपून काढले. पावसाचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. स्वारगेट, वारजे, शिवाजीनगर आणि जंगली महाराज रस्ता या भागांमध्ये एक ते दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली.(Pune Heavy Rain)
 
पाण्याच्या साच्यामुळे रस्ते आणि फुटपाथ यातील फरकच अस्पष्ट झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना दिवसा देखील हेडलाईट लावून वाहन चालवावे लागत होते. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.(Pune Heavy Rain)
 
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके आडवी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, अवकाळी पावसाने त्यांच्या अडचणीत भर घातली आहे.(Pune Heavy Rain)
 
यावर हवामानतज्ज्ञांचं म्हणणं काय आहे?
 
हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि काही प्रमाणात विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. दुपारनंतर निर्माण होणाऱ्या ‘विंड डिस्कन्टीन्यूटी’मुळे हे वातावरण तयार होत असून, संध्याकाळपर्यंत त्याचा प्रभाव राहतो.(Pune Heavy Rain)
 
तसेच, तापमानातील अचानक घसरणही जाणवते आहे. दुपारी ३५ ते ३६ अंशांवर असलेले तापमान पावसानंतर २९ अंशांपर्यंत खाली येत आहे. या झपाट्याने होणाऱ्या बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.(Pune Heavy Rain)
 
पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणेकरांसाठी एप्रिल महिन्यातील हा पावसाचा अनपेक्षित अनुभव ठरत आहे.(Pune Heavy Rain)
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com