(Jaipur Pink Elephant Shoot) राजस्थानचे पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपुरमध्ये केलेले पिंक फोटोग्राफी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका रशियन फोटोग्राफर जुलिया बुरुलेवा ने केलेले फोटोशूट सोशल मिडियावर शेअर केले होते. सोशल मिडियावर तो फोटोशूट व्हायरल तुफान झाले होते. मात्र, काही दिवसांतच ६५ वर्षीय ‘चंचल’ हत्तीणीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
नेमके प्रकरण काय?
जयपूरजवळील एका जुन्या मंदिर परिसरात हे फोटोशूट करण्यात आले होते. राजस्थानच्या संस्कृतीने प्रेरित होऊन ‘पिंक एलिफंट’ ही संकल्पना साकारण्यात आली होती. यासाठी स्थानिक परिसरातील 'चंचल' हत्तीला गुलाबी रंगाने रंगवून यशस्वी नावाच्या मॉडलला हत्तीवर बसवून हे फोटोशुट पार पडले होते.
मृत्यूनंतर पसरली संतापाची लाट
फेब्रुवारी महीन्यात हे फोटोशुट पार पडल्यानंतर मागील महिन्यात 'चंचल' हत्तीणीचा मृत्यू झाला. यानंतर सोशल मिडियावर संतापाची लाट पसरली आहे. काही युजर्सने कमेंट करत आपला राग ही व्यक्त केला आहे. फोटोज सुंदर दिसण्यासाठी मुक्या प्राण्याला त्रास देणे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही आता सोशल मिडियावर युजर्सनी विचारले आहेत. या घटनेनंतर अनेक प्राणी संघटना विशेषत: 'पेटा' (PETA) इंडियाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्राणीप्रेमींच्या मते, हत्तींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते आणि त्यांचा वापर अशा प्रयोगांसाठी किंवा पर्यटनासाठी करण्यात येऊ नये. छायाचित्रकाराने डिजिटल एडिटिंग किंवा एआय (AI) चा वापर करायला हवा होता असेही अनेकांनी आपले मत हे व्यक्त केले आहे.
फोटोग्राफरचे स्पष्टीकरण
दरम्यान जुलिया बुरुलेवाने या प्रकरणानंतर स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले आहे की, फोटोशूटमध्ये वापरलेला रंग होळीच्या गुलालाप्रमाणेच सेंद्रिय आणि स्थानिक पातळीवर तयार केलेला होता आणि हा रंग काही मिनिटांनी धुवुनही टाकण्यात आला होता. यामुळे या हत्तीला कोणत्याही प्रकारची इजा ही झालेली नाही.
हत्तीच्या मालकाने आणि 'हत्ती गाव विकास समिती' चे अध्यक्ष बल्लू खान याने 'चंचल' हत्तीचा मृत्यूनंतर हा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु हत्तींना अशा पद्धतीने रंगवून फोटोशूट साठी वापरणे कितपत योग्य आहे असा सवालही सोशल मिडियावर केला जात आहे.