मुंबई: (Narendra Modi) महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर संसदेत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवार दि. १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संबोधनात ते महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि विरोधकांवर टीका या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Narendra Modi)
लोकसभेत झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडली. एकूण ५२८ खासदारांनी मतदानात सहभाग घेतला होता. मात्र घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळू शकले नाही. यामुळे हे महत्त्वाचे विधेयक नामंजूर झाले. आवश्यक असलेल्या मतांपेक्षा ५४ मतांनी सरकार कमी पडले, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली. काल संसदेत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर, महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महिलांच्या हक्कांचाच विरोध केला. तसेच विरोधकांची महिलांविषयीची भूमिका नकारात्मक असल्याचा संदेश देशभर पोहोचवला आहे. (Narendra Modi)
दरम्यान, या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकार मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. या सर्व घडामोडींमुळे आता देशाचे लक्ष पंतप्रधान मोदी यांच्या रात्रीच्या संबोधनाकडे लागले आहे. ते या राजकीय पराभवावर कशी प्रतिक्रिया देतात, पुढील रणनीती काय असेल आणि विरोधकांवर किती आक्रमक भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Narendra Modi)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.