नाशिक : (Jitendra Shelke Death Case) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एक मोठे आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणाशी संबंधित शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना त्यांच्या कारची उभ्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या अपघातात शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाल्याची माहिती असून, त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.(Jitendra Shelke Death Case)
अशोक खरात प्रकरण आधीच वादाच्या भोवऱ्यात असताना घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवनिका ट्रस्टचे नाव या प्रकरणात वारंवार समोर येत असून तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र, या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा साधा अपघात आहे की यामागे घातपाताचा संशय आहे, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.(Jitendra Shelke Death Case)
दरम्यान, या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत, “ही घटना धक्कादायक असून यामध्ये घातपाताचा वास येतो,” असे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात किंवा त्याच्या निकटवर्तीयांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा होती आणि ही घटना त्या शक्यतेला अधिक बळ देणारी आहे. या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याआधीच हा मृत्यू झाला असल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे त्यांनी सांगितले.(Jitendra Shelke Death Case)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, शेळके यांची काही दिवसांपूर्वी चौकशी झाली होती आणि त्यानंतरच हा अपघात घडणे संशयास्पद आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या माहितीवर पडदा टाकण्यासाठी हा अपघात घडवण्यात आला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.(Jitendra Shelke Death Case)
तसेच, तृप्ती देसाई यांनीही या मृत्यूला संशयास्पद ठरवत, या प्रकरणातील साक्षीदारांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी असेही नमूद केले की, या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच शेळके यांना लक्ष्य करण्यात आले असावे.(Jitendra Shelke Death Case)
दरम्यान, पोलिसांकडून या अपघाताचा सखोल तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनाच्या स्थितीचा अभ्यास करून हा अपघात होता की घातपात, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे अशोक खरात प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Jitendra Shelke Death Case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.