Amit Shah on Women Reservation Bill : ‘जर-तर’ राजकारणावर अमित शाहांची टीका; महिला आरक्षणावरून संसदेत खडाजंगी

Total Views |
Amit Shah on Women Reservation Bill
 
नवी दिल्ली : (Amit Shah on Women Reservation Bill) महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन प्रक्रियेवरून लोकसभेत जोरदार राजकीय संघर्ष सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष या विधेयकाला थेट विरोध करत नसले, तरी ‘जर-तर’च्या अटी घालून त्याला अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
अमित शाह यांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षणाला कोणीही उघडपणे विरोध करत नाही; मात्र विरोधक त्याला विविध अटी जोडून त्याची अंमलबजावणी उशिरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः मतदारसंघ पुनर्रचनेला (परिसीमन) विरोध करणे म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागा वाढवण्यालाच विरोध करणे होय, असे त्यांनी ठामपणे सांगितले.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
या घटनादुरुस्ती विधेयकावर सभागृहात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असून, सुमारे १३३ खासदारांनी आपली मते मांडली. यामध्ये ५६ महिला खासदारांचा सहभाग होता, जो स्वतःमध्ये एक विक्रम मानला जात आहे. शाह यांनी सांगितले की, जर विरोधकांनी परिसीमन प्रक्रियेला पाठिंबा दिला, तर देशातील प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मताला समान महत्त्व मिळेल.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या ५४३ जागांच्या आधारावर महिला आरक्षण लागू केल्यास काही राज्यांमध्ये मर्यादित जागाच महिलांसाठी राखीव राहतील. उदाहरणार्थ, तामिळनाडूमध्ये केवळ १३ जागा महिलांसाठी राखीव राहतील, तर २६ जागा खुल्या राहतील. २०११ च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण लागू केल्यास काही राज्यांतील संसदीय जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने हा मार्ग न स्वीकारता प्रत्येक राज्यातील जागा सुमारे ५० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
इतिहासाचा संदर्भ देत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आणीबाणीच्या काळात काँग्रेसनेच देशातील नागरिकांना परिसीमन प्रक्रियेपासून वंचित ठेवले होते आणि आजही त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
हेही वाचा : Rahul Gandhi Lok Sabha speech : महिला आरक्षणावरून संसदेत रणकंदन! ‘जादूगार’ वक्तव्याने पेटला वाद; सरकारचा ठाम पलटवार 
 
दरम्यान, महिला आरक्षण कायद्यात सुधारणा आणि परिसीमन आयोग स्थापन करण्यासाठी तीन महत्त्वाची विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली आहेत. यात ‘संविधान (एकशे एकतीसवी दुरुस्ती) विधेयक, २०२६’, ‘परिसीमन विधेयक, २०२६’ आणि ‘केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ यांचा समावेश आहे. ही विधेयके १६ एप्रिल रोजी सभागृहात मांडण्यात आली.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, या विधेयकांवर सुमारे १५ ते १८ तास चर्चा होणार असून १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मतदान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सुरुवातीला १२ तासांच्या चर्चेचा प्रस्ताव मांडला होता, मात्र चर्चा वाढवण्याचा अंतिम निर्णय अध्यक्षांनी घेतला.(Amit Shah on Women Reservation Bill)
या विधेयकांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर विरोधी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी सरकारवर महिला आरक्षण आणि परिसीमन यांना एकत्र आणून राजकीय फायद्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
मात्र, केंद्र सरकारने हे सर्व आरोप फेटाळत महिला आरक्षण विधेयक हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचे स्पष्ट केले आहे. संविधान दुरुस्तीच्या मसुद्यानुसार, २०११ च्या जनगणनेवर आधारित परिसीमनानंतर २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी हे आरक्षण लागू केले जाईल. यासाठी लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून कमाल ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
महिला आरक्षण आणि परिसीमन या दोन्ही मुद्द्यांवरून संसदेत तीव्र राजकीय वातावरण निर्माण झाले असून, येत्या मतदानातून या विधेयकांचे भवितव्य ठरणार आहे.(Amit Shah on Women Reservation Bill)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com