नाशिक : (Nida Khan) बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेल्या कार्पोरेट जिहाद प्रकरणी नाशिक शाखेत एचआर मॅनेजर असलेल्या निदा खान (Nida Khan) हिच्या जिहादी षड्यंत्राचा खुलासा झाल्यापासून ती फरार आहे. पोलिसांना तिचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी नऊ गुन्हे दाखल केले असून आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, या घटनेची मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या २० दिवसांपासून फरार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.(Nida Khan)
सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील निदा खान (Nida Khan) टीसीएस कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून कार्यरत होती. दररोजच्या नियोजनासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये ती हिंदू तरुणींचा छळ आणि धर्मांतर करण्यासाठी आरोपींना प्रोत्साहन द्यायची. त्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. हे प्रकरण उघडकीस येताच ती फरार झाली. पोलिसांचे तीन पथके तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश येथील छांगूर बाबा प्रमाणेच नाशिकच्या प्रकरणातदेखील आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा नाशिक पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच एनआयएची मदत घेतली जात आहे.(Nida Khan)
तरच प्रकरणाचा होईल उलगडा...
निदाचे पूर्ण नाव निदा एजाज खान (Nida Khan) असून ती २६ वर्षांची आहे. या कंपनीत ती २०२१ पासून कामावर असून नाशिकच्या द्वारका परिसरात तिचे माहेर आहे. तर तिचा पती एका खासगी कंपनीत कामाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीमधील मुस्लिम तरुणांच्या प्रेमात हिंदू तरुणींना पाडून धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यात निदा मुख्य भूमिकेत होती. त्यासाठी तिने अटक करण्यात आलेल्या आरोपींना सर्वतोपरी मदत केली. आरोपींच्या विरोधात हिंदू तरुणींनी ७८ तक्रारी करुनही निदाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळेच तिचे आंतरराष्ट्रीय धर्मांतरण टोळीशी संबंध असण्याची दाट शक्यता आहे.(Nida Khan)
या प्रकरणात निदा खान (Nida Khan) मास्टरमाइंड असली तरी खरे सूत्रधार कंपनीतच इतरत्र असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी कंपनीच्या १५० कर्मचाऱ्यांना घरून ऑनलाईन काम करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाची टीम १८ एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार आहे. त्यापूर्वी घडलेल्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा हेतू असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. यासोबतच कर्मचाऱ्यांनी या घटनेसाठी टीसीएसच्या मुख्य व्यवस्थापनाकडून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षाला जबाबदार धरले आहे.(Nida Khan)
निदा केरळला पळाली?
निदा खानची पाठराखण कंपनी व्यवस्थापनातील कुणीतरी करत होते. तिचे पीएफआयशी कनेक्शन असून तिचे आंतरराष्ट्रीय धर्मांतरण रॅकेटशी संबंध आहेत. निदाला पीएफआयची मदत मिळत असून ती केरळला फरार झाली आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा निदा फरारा झाल्यापासून कंपनीच्या वर्तुळात चर्चिल्या जात आहेत.(Nida Khan)
दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.