मुंबई : (Andaman Sea Boat Tragedy) अंदमान समुद्रात एका जहाजाला अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत सुमारे अडीचशे लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे जहाज रोहिंग्या निर्वासित आणि बांग्लादेशी नागरिकांना घेऊन मलेशियाकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. (Andaman Sea Boat Tragedy)
दक्षिण बांग्लादेशच्या किनाऱ्यावरून निघालेले आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेले हे जहाज मलेशियाकडे निघाले होते. खवळलेल्या समुद्रात आणि वेगवान वाऱ्यांमध्ये हे जहाज सापडून ते उलटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.आतापर्यंत फक्त ९ जणांची सुटका करण्यात आली असून शोध व बचावकार्य सुरू आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी घडल्याचा प्राथमिक अंदाज असून बचाव पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तांनी (UNHCR) एका निवेदनात म्हटले आहे की, "दक्षिण बांगलादेशातील टेकनाफ येथून निघालेली आणि मलेशियाच्या दिशेने जाणारी ती ट्रालर, सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि क्षमतेपेक्षा अधिक गर्दी यामुळे बुडाल्याचे वृत्त आहे."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\