Bihar New CM : सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री, शपथविधी संपन्न!

    15-Apr-2026   
Total Views |

मुंबई : (Bihar New CM) बिहारच्या राजकीय इतिहासातील एका नव्या पर्वाला आज सुरूवात झाली आहे. सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा शपथविधी सकाळी ११ वाजता बिहार लोक भवन येथे पार पडला. सम्राट चौधरी बिहारमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. (Bihar New CM)

जेडीयूचे विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनीही बिहारच्या नव्या सरकारमध्ये पदाची शपथ घेतली. दोघांचीही उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला नितीश कुमार उपस्थित होते. बिहारमध्ये अद्याप मंत्रिमंडळाची घोषणा झालेली नाही. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द करत आपल्या राजकीय कारकिर्दीच्या नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. त्यांनी २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. (Bihar New CM)





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\