मुंबई : (Bypoll) २०१- बारामती आणि २२३- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचन सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी २०१- बारामती विधानसभा मतदारसंघ आणि २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.(Bypoll)