उध्दव ठाकरेंनी राजकीय धुरंधरपणा दाखवला असता तर ही वेळ आली नसती- प्रविण दरेकर
13-Apr-2026
Total Views |
मुंबई :(Pravin Darekar)"उद्धव ठाकरेंनी चपळाई केली असती, राजकीय धुरंदरपणा दाखवला असता तर अशी वेळच आली नसती. स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी कसे मातीमोल केल आहे ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे माती आणि मातेविषयी त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का हे त्यांनी पहावं. उलट मातीशी इमान राखण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. आणि मातेसारखे ज्या शिवसेनेला शिंदे यांनी जपलं होतं त्या शिवसैनिकांसाठी ते काम करत आहेत." असे रोखठोक मत भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी रविवार दि.१२ रोजी व्यक्त केले.
"रोहित पवार भविष्यकार कधी झाले मला माहीत नाही. त्यांनी आमच्या सत्ताधारी पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच काय होते आहे त्याच आत्मपरीक्षण करावे. कोणत्याही उद्देशाने भोंदू खरातची चौकशी होत नाही तर अशा प्रवृती पुढे येत असतील तर त्या ठेचून काढल्या पाहिजेत ही भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.भोंदू खरात प्रकरणात कोणीही असतील तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी सत्ताधारी पक्षाने केलेली ही गोष्ट नाही आहे." असे प्रतिपादन देखील दरेकर यांनी केले.
"शरद पवार यांनी सातत्याने नास्तिकाची भूमिका घेतलेली आहे अनेकदा त्यांनी तसे बोलून दाखवलेले आहे. वारकरी संप्रदायाच्या विचाराची थोर परंपरा आहे अशा परंपरेला डीवचण्याचे काहीच कारण नव्हते. शरद पवार यांचा संप्रदायाप्रती असलेला उमाळा सर्वांना माहित आहे. त्यांचा ढोंगीपणा उघड झालेला आहे." असेही दरेकर म्हणाले.
"अजित दादांच्या अपघाती निधनानंतर प्रमुख पक्षानी सुनेत्रा ताई पवार समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक प्रक्रिया म्हणून बारामतीची निवडणूक होईल.अनेक हौसे, नवसे ,गवसे म्हणून अपक्ष उमेदवार उभारलेले आहेत. अजितदादांच्या योगदानातून उतराई बारामतीकर एकतर्फी होतील असा मला ठाम विश्वास आहे. आणि प्रचंड मताने सुनेत्राताई पवार निवडून येतील." असेही दरेकर(Pravin Darekar)यांनी स्पष्ट केले.