मुंबई : (Goregaon NESCO Centre Drugs case) गोरेगाव पूर्व येथील NESCO Exhibition Centre येथे ११ एप्रिलच्या रात्री रंगलेला एक भव्य टेक्नो म्युझिक कॉन्सर्ट काही क्षणांतच शोकांतिकेत परिवर्तित झाला. उत्साह, संगीत आणि जल्लोषाने भरलेली ही रात्र अचानक भीती, गोंधळ आणि दु:खाने व्यापली गेली, जेव्हा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन तरुण (एक २४ वर्षीय महिला आणि एक २८ वर्षीय पुरुष) एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर एक विद्यार्थिनी अजूनही जीवासाठी झुंज देत आहे.(Goregaon NESCO Centre Drugs case)
या कार्यक्रमासाठी सुमारे २,००० हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती आणि प्रवेशासाठी सुमारे २,००० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. नामांकित एमबीए कॉलेजमधील १५-१६ विद्यार्थ्यांचा एक गट या कॉन्सर्टला सहभागी झाला होता. हे विद्यार्थी लहान ग्रुप्समध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचले. पार्टी रंगात आल्यानंतर, या गटातील १० ते १२ जणांनी ‘एमडी’ (MD) आणि ‘एमए’ (MA) सारख्या घातक अमली पदार्थांचे सेवन केले.(Goregaon NESCO Centre Drugs case)
नशेच्या भरात काहींनी ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त, म्हणजे दोन-दोन डोस घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मध्यरात्रीच्या सुमारास २० ते २८ वयोगटातील दोन महिला आणि एका पुरुषाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर २५ वर्षीय आणखी एक महिला सध्या आयसीयूमध्ये गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.(Goregaon NESCO Centre Drugs case)
तपासात काय उघडकीस आलं?
तपासात समोर आले की संबंधित विद्यार्थ्यांनी एमडीएमए (MDMA) प्रकारातील ड्रग्सचे सेवन केले होते. मिथिलिनडायऑक्सिमेथॅम्फेटामाइन म्हणून ओळखले जाणारे हे कृत्रिम मनोविकारक औषध ‘एक्स्टसी’ किंवा ‘मॉली’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे औषध ऊर्जा वाढवते, परंतु त्याचा अतिरेक जीवघेणा ठरू शकतो.(Goregaon NESCO Centre Drugs case)
या प्रकरणी वनराई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आयोजक आणि मृतांच्या साथीदारांसह एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कार्यक्रमाचा मुख्य आयोजक विहान उर्फ आकाश सामल, नेस्को सेंटरचा व्यवस्थापक सनी जैन, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बालकृष्ण कुरुप, तसेच अमली पदार्थ पुरवठादार रौनक खंडेलवाल, आनंद पटेल आणि प्रतीक पांडे यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(Goregaon NESCO Centre Drugs case)
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या आनंद पटेलला पकडण्यासाठी पोलिसांनी कल्याणमधील वायले नगर येथे पहाटे छापा टाकला. सुरुवातीला त्याने दरवाजा उघडण्यास नकार देत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासात असेही समोर आले की आरोपींनी ६ ते ७ अंमली पदार्थच्या गोळ्या मुंबईबाहेरून आणल्या होत्या. सध्या पोलिस अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्य़ा साखळीचा सखोल तपास करत असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच २० ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर अंमली पदार्थ विक्रेत्यांचाही शोध सुरू आहे.(Goregaon NESCO Centre Drugs case)
मुंबईतील 'पार्टी कल्चर'...
ही घटना केवळ एका कॉन्सर्टपुरती मर्यादित न राहता मुंबईतील वाढत्या ‘पार्टी कल्चर’वर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. आजच्या शहरी तरुणाईमध्ये नाईटलाइफ, म्युझिक फेस्टिव्हल्स, क्लबिंग आणि ‘हाय-प्रोफाइल’ पार्ट्यांचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे. NSCI Dome तसेच अंधेरी, बांद्रा आणि जुहू येथील क्लब्स ही या संस्कृतीची प्रमुख केंद्रं बनली आहेत. इथे पार्टी म्हणजे केवळ डान्स नव्हे, तर लाईव्ह DJ, EDM/टेक्नो म्युझिक, लाईट्स आणि सोशल मीडिया-फ्रेंडली “experience” असतो.(Goregaon NESCO Centre Drugs case)
तिकीट दर साधारण ₹१००० ते ₹३००० पासून सुरू होऊन VIP साठी ₹८०००, तर मोठ्या फेस्टिव्हल्ससाठी ₹१५००० पर्यंत जातात. Early bird, couple entry आणि group dealsमुळे तरुण आधीच नियोजन करतात. मात्र खर्च इथेच थांबत नाही drinks, table booking आणि after-partiesमुळे एका रात्रीचा खर्च सहज ₹५००० ते ₹२०००० पर्यंत पोहोचतो. Instagram reels, stories आणि influencersमुळे “FOMO” वाढतो आणि पार्टीला जाणं हे एक प्रकारचं status symbol बनतं.(Goregaon NESCO Centre Drugs case)
एका बाजूला हे culture networking, confidence आणि नव्या अनुभवांची संधी देतं; तर दुसऱ्या बाजूला peer pressure, late-night lifestyle आणि alcohol किंवा drugsसारख्या धोकादायक सवयींकडे ढकलण्याची शक्यता निर्माण करते. “Live in the moment” या विचाराने प्रेरित झालेली आजची तरुणाई अधिक experimental झाली असली, तरी “fun” आणि “risk” यांच्यातली रेषा अधिकाधिक धूसर होत चालली आहे.(Goregaon NESCO Centre Drugs case)
ही केवळ एक हेडलाईन नाही, तर वाढत्या ‘पार्टी कल्चर’चा गंभीर इशारा आहे. ती स्पष्टपणे दाखवून देते की ‘फन’ आणि ‘रिस्क’ यांच्यातली सीमारेषा किती नाजूक झाली आहे. ही फक्त एका कॉन्सर्टची गोष्ट नाही, तर दिशाहीन होत चाललेल्या प्रवृत्तीचं अस्वस्थ करणारे प्रतिबिंब आहे, जिथे मर्यादा विसरून जगण्याची किंमत किती मोठी असू शकते, याचा कटू अनुभव समोर येतो.
शेवटी प्रश्न तोच ही घटना खरोखर बदल घडवेल, की फक्त आणखी एका आकड्याची भर घालून काळाच्या ओघात विस्मरणात जाईल?(Goregaon NESCO Centre Drugs case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.