१९ वर्षाचा अयान अहमद तन्वीर अहमदने नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणालाही मागे टाकत एका नव्या जिहादाला जन्म घातला आहे. नाशिकचं अशोक खरात प्रकरण, रवींद्र एरंडे प्रकरण आणि कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता अमरावतीतील अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातून तब्बल आणखी एक प्रकरण उदयास आलं आहे. १८० अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयान अहमद तन्वीर अहमदला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी त्याच्या या कृत्यांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारीत करायचा. जिहादी मानसिकता घेऊन गुन्हे करणाऱ्या या तरूणावर पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकरण उघडकीस कसं आलं? आणि हा अयान अहमद तन्वीर अहमद आहे तरी कोण आणि त्याला कुठल्या राजकीय पक्षाचं अभय आहे? (Amravati Minor Girl Video Leak Case)
आमदार प्रवीण तायडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आणि त्यातूनच समोर आलं एक भयानक वास्तव. भाजप राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे. सुमारे १८० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले असून ३५० हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय आरोपी अयान अहमद हा एमआयएम चा कार्यकर्ता असल्याचा दावाही अनिल बोंडे यांच्याकडून करण्यात आला आहे. (Amravati Minor Girl Video Leak Case)
आरोपी अयान अहमद हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स विशेषतः इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यांचा वापर करून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधायचा. सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेमाचं नाटक… आणि त्यानंतर विश्वास संपादन करून, तो त्यांचं लैंगिक शोषण करून त्याचं अश्लील चित्रीकरण करायचा. याहून धक्कादायक म्हणजे, या मुलींच्या इच्छेविरुद्ध काढलेले फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर प्रसारित करत होता. या प्रकरणात तब्बल १८० हून अधिक मुलींचे व्हिडिओ प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला असून, काही वृत्तांनुसार हा आकडा ३५० व्हिडिओंपर्यंत जाऊ शकतो. या व्हिडिओंच्या आधारे आरोपी मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि बदनामीची भीती दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जायचा. त्यामुळे अनेक पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबिय अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे येण्यास धजावलेलं नाही. (Amravati Minor Girl Video Leak Case)
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९४, पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ तसेच आयटी अॅक्ट २००० च्या कलम ६७ आणि ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉस्को कायद्याचं स्वरुप काय आहे ते थोडं जाणून घेऊयात. ज्यात १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचं शोषण, उत्पीडन, अश्लीलता अशा गंभीर गुन्ह्यांविरोधात हा कायदा कवच म्हणून काम करतो. ज्यात आरोपीला जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्यांची सुनावणी विशेष न्यायालयापुढे होते. (Amravati Minor Girl Video Leak Case)
सध्या पोलीसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातील डेटा तपासासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपार्ह व्हिडिओ महाराष्ट्र सायबर विभागाकडून हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आता या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच प्रवीण तायडे यांनीही पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करत आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे आता एसआयटी चौकशीचीही मागणी जोर धरत आहे. (Amravati Minor Girl Video Leak Case)
बदनामीच्या भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना सहकार्याचे आवाहन केले आहे. पीडित मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्यांना समुपदेशनासह सर्व कायदेशीर मदत दिली जाईल, तरी अशा विकृत्तांना शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यलयातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्टला प्रतिसाद देऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Amravati Minor Girl Video Leak Case)
घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय की, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संबंध ठेवताना विशेष सावधगिरी बाळगणं किती गरजेचं आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार? अयान अहमदला आणखी कोणाची फूस होती का? पीडित तरूणींना न्याय मिळणार का? आणि आणखी अशी किती प्रकरणं बाहेर येणार आहेत? असे अगणित प्रश्न निर्माण होत आहेत. (Amravati Minor Girl Video Leak Case)