LPG booking fraud: ‘गॅस सबसिडी अपडेट करा’ म्हणत खातं साफ? LPG बुकिंगच्या नावाखाली नवी ऑनलाइन फसवणूक?

Total Views |

LPG booking fraud 
 
मुंबई : (LPG booking fraud) गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीसोबतच आता ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही झपाट्याने वाढत आहेत. गॅस बुकिंग आणि सबसिडी अपडेटच्या नावाखाली सायबर गुन्हेगार नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (LPG booking fraud)
 
सायबर चोरटे स्वतःला गॅस एजन्सीचे कर्मचारी सांगत नागरिकांना फोन करतात. “तुमची सबसिडी अपडेट करायची आहे”, “गॅस बुकिंग कन्फर्म करा” किंवा “कनेक्शन बंद होणार आहे” अशा कारणांनी घाई निर्माण केली जाते. त्यानंतर मोबाईलवर लिंक पाठवली जाते किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. (LPG booking fraud)
 
फसवणुकीचा ‘हा’ आहे धोकादायक फंडा.... (LPG booking fraud)
 
सायबर चोरट्यांकडून नागरिकांना एक लिंक पाठवली जाते. पाठवलेली लिंक किंवा अॅप्स हे पूर्णपणे बनावट असते. त्यांनी पाठवलेल्या लिंकवर ते नागरिकांना मोबाईल नंबर, बँक तपशील, ATM कार्ड नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायला लावतात. रजिस्ट्रेशन पुर्ण झाल्यावर एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी शेअर केल्यावर काही मिनिटांतच खात्यातील पैसे गायब! (LPG booking fraud)
 
अनेक प्रकरणांमध्ये हजारो ते लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल व्यवहारांबाबत कमी माहिती असलेले लोक या जाळ्यात अडकत आहेत. (LPG booking fraud)
 
गुन्हेगार कसे फसवतात? (LPG booking fraud)
 
सायबर तज्ज्ञांच्या मते, गुन्हेगार लोकांच्या भीतीचा फायदा घेतात. गॅस बंद होईल, सबसिडी थांबेल, बुकिंग रद्द होईल अशा धमक्या देऊन ते तात्काळ कृती करण्यास भाग पाडतात. (LPG booking fraud)
 
कधीही करू नका 'या' चुका... (LPG booking fraud)
 
फोनवर आलेले OTP, CVV, पासवर्ड कोणालाही सांगू नका.
 
अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
 
संशयास्पद अॅप डाउनलोड करू नका.
 
बँक किंवा गॅस कंपनी कधीही फोनवर माहिती मागत नाही.
 
सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? (LPG booking fraud)
 
अधिकृत गॅस कंपनीची वेबसाइट किंवा अॅपच वापरा.
 
एजन्सीचा अधिकृत नंबरचाच वापर करा.
 
वेबसाइटचा URL नीट तपासा.
 
संशयास्पद कॉल/मेसेज लगेच दुर्लक्षित करा.
 
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही माहिती देण्यापूर्वी खातरजमा करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (LPG booking fraud)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com