RBI UPI rules: ₹१०,००० च्या ट्रान्सफरसाठी १ तासाचा अडथळा? काय आहेत RBI चे नवे नियम ?

Total Views |
 
RBI UPI rules
 
मुंबई: (RBI UPI rules) सध्या डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असताना ग्राहकांच्या सुरक्षेसाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत. UPI व्यवहार, PhonePe आणि Google Pay सारख्या अॅप्सचा वापर करणाऱ्यांसाठी हे नियम विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत. (RBI UPI rules)
 
पूर्वी बँकेत जाऊन पैसे काढणे किंवा भरणे ही प्रक्रिया वेळखाऊ होती. मात्र आता एका स्कॅनमध्ये व्यवहार होतात. मात्र आता या सोयीसोबतच सायबर फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. फेक लिंक, फसवे कॉल आणि अॅप हॅकिंगमुळे अनेकांचे खाते रिकामे होत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. (RBI UPI rules)
 
१०,००० रुपयांवरील व्यवहारावर 'कूलिंग ऑफ' पिरियड?
 
RBI च्या प्रस्तावित नियमानुसार, ₹१०,००० पेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्यास, ती रक्कम लगेच ट्रान्सफर न होता १ तासाचा 'कूलिंग ऑफ' पिरियड असेल. या वेळेत व्यवहार चुकीचा वाटल्यास तो लगेच रद्द करता येईल. (RBI UPI rules)
 
उदाहरण: तुम्ही ₹१५,००० ट्रान्सफर केलात, मात्र त्या व्यवहारात तुम्हाला काही गडबड वाटली तर, १ तासाच्या आत तुम्हाला तो व्यवहार थांबवण्याची संधी मिळेल. (RBI UPI rules)
 
‘किल स्विच’ सुविधा...
 
RBI कडून ‘किल स्विच’ ही नवी सुविधा आणण्याचा प्रस्ताव आहे. किल स्विच म्हणजे, तुमचा मोबाइल हरवला किंवा हॅक झाला तर एका क्लिकने सर्व डिजिटल व्यवहार थांबवता येतील. हे UPI, नेट बँकिंगसाठी आहे आणि तुमच्या परवानगीशिवाय काही होणार नाही. (RBI UPI rules)
 
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी अतिरिक्त सुरक्षा...
 
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आता ₹५०,००० पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी अधिक पडताळणी आवश्यक असणार आहे. यामुळे त्यांना फसवणुकीपासून संरक्षण मिळणार आहे. (RBI UPI rules)
 
हे नियम लागू करण्यापूर्वी नागरिकांना ८ मेपर्यंत अभिप्राय देण्याची संधी देण्यात आली आहे. हे सर्व बदल अंतिम नियम म्हणून पूर्णपणे लागू झालेले नाहीत, तर काही बाबी प्रस्ताव/चर्चा स्तरावर आहेत आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होऊ शकते. (RBI UPI rules)
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com