Dosa Batter Crime: डोशाच्या पिठातून विषबाधा की काहीतरी वेगळंच? अहमदाबादमध्ये दोन चिमुकल्यांचा मृत्यू; डायरीतून धक्कादायक संकेत!

Total Views |
 
Dosa Batter Crime
 
अहमदाबाद : (Dosa Batter Crime) अहमदाबाद मधील चांदखेडा परिसरात प्रजापती कुटुंबातील दोन लहान मुलींच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला डोशाच्या पिठातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र प्राथमिक फॉरेन्सिक निष्कर्षांनंतर तपासाने वेगळे वळण घेतले असून, आता तपास यंत्रणा सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाच्या शक्यतेकडेही पाहत आहे. (Dosa Batter Crime)
 
पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांची राहा आणि चार वर्षांची मिश्री यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंतिम फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या घटनेतून बचावलेल्या पालकांच्या रक्त तपासणीत ‘अॅल्युमिनियम फॉस्फेट’ आणि ‘झिंक’चे प्रमाण जास्त आढळून आले आहे, जी गंभीर बाब मानली जात आहे. (Dosa Batter Crime)
 
सुरुवातीला स्थानिक डेअरीमधून आणलेल्या पिठामुळे विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्याच पिठाचा वापर केलेल्या इतर ग्राहकांना कोणताही त्रास झाला नसल्याने हा संशय कमी झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलत इतर शक्यता तपासायला सुरुवात केली आहे. (Dosa Batter Crime)
 
तपासात नवीन धागेदोरे काय? (Dosa Batter Crime)
 
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विमल प्रजापती आणि त्यांच्या पत्नी भावना यांच्या रक्तातील रासायनिक घटकांचा मुलींच्या मृत्यूशी संबंध आहे का, याचा तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे. घरातून जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. (Dosa Batter Crime)
 
तपासादरम्यान घरातून एक वैयक्तिक डायरी सापडली आहे. या डायरीतील नोंदींमध्ये मुलगा होण्याची तीव्र इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. मुलगा झाल्यास मंदिरात जाऊन नवस फेडण्याचाही उल्लेख आढळून आला आहे. या नोंदी दुसऱ्या मुलीच्या जन्मापूर्वी लिहिल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.(Dosa Batter Crime)
 
या पार्श्वभूमीवर पोलिस मानसिक आणि कौटुंबिक कारणांचा तपास करत आहेत. या घटनेमागे कोणतेही सामाजिक किंवा मानसिक दडपण होते का, याचाही शोध घेतला जात आहे. त्याशिवाय, घरातून ‘अॅल्युमिनियम फॉस्फाइड’युक्त कीटकनाशकाचे पाकिटेही जप्त करण्यात आली आहेत. या रसायनांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे. (Dosa Batter Crime)
 
पोलिसांनी अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष काढलेला नसून, अंतिम फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या दुर्दैवी घटनेमागील खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले आहे. (Dosa Batter Crime)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com