डॉक्टर आयुष्यभर रुग्णाला फक्त औषधेच देतात, हा समज दूर करत आपल्या उपचारांनी रुग्णाच्या आयुष्यातून कायमची औषधे हद्दपार करणाऱ्या डॉ. रत्ना कुणाल चोपडे यांच्याविषयी...
गेल्या काही दशकांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांनी सातत्यपूर्ण प्रगती साधली. म्हणूनच, आज अगदी दुर्धर आणि गंभीर आजारांवरही उपचार सहससाध्य होतात. अशाच प्रकारे असाध्य आजारांवर उपचारांसाठी एका नवीन चिकित्सा पद्धती ‘होमिओपॅथी’चा शोध लावणारे डॉ. सॅम्युअल हॅनेमान हे जर्मन डॉक्टर होते. डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांच्या जन्मदिनी, दि. 10 एप्रिल रोजी ‘विश्व होमिओपॅथी दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. डॉ. हॅनेमान यांनी 250 वर्षांपूव संशोधन केलेल्या उपचार पद्धतीला तितक्याच निष्ठेने, त्यांच्या तत्त्वानुसार अवलंब करणाऱ्या त्यांच्या अनुयायी, एक निष्णात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणजे रत्ना चोपडे.
‘डॉ. रत्नाज् होमिओपॅथी’च्या संस्थापिका डॉ. रत्ना चोपडे हे ‘होमिओपॅथी’ क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व. मध्यमवगय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. रत्ना चोपडे यांचे लहानपणीच पितृछत्र हरपल्यानंतर त्यांच्या आईने मोठे कष्ट उपसत त्यांना उच्चशिक्षण दिले. त्यांचे वैद्यकीय शिक्षण नाशिकच्या ‘मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज’ येथे झाले. मानसोपचार व समुपदेशन यात ‘मास्टर’ ही पदवी त्यांनी मिळवली. ‘एमडी होमिओपॅथी’चे शिक्षण घेत असतानाच, त्यांचा विवाह कुणाल चोपडे यांच्यासोबत झाला. महाराष्ट्र सरकारमध्ये राजपत्रित अधिकारी असलेले चोपडे यांनी नेहमीच रत्ना यांना उच्चशिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील कारकिदस साथ दिली. ‘होमिओपॅथी’ उपचार पद्धतीतील असाध्य आजार बरे करण्याची शक्ती ही संशोधनाच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी त्यांनी ‘पीएचडी’ होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमासाठी नवी मुंबई येथील ‘वाय.एम.टी. होमिओपॅथिक महाविद्यालया’त प्रवेश घेतला. होमिओपॅथिक वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी ‘पीएचडी’ होमिओपॅथी, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातून लवकरच त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांची वैद्यकीय कारकीर्द पुणे, सोलापूर, नागपूर येथे पार पडली. नऊ वर्षे त्यांनी नवजात बालक व लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नामांकित रुग्णालयांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ‘उडान ग्रुप ऑफ होमिओपॅथी’चे डॉ. मोहनदास गाडबैल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक असाध्य आजारांवर होमिओपॅथीद्वारे अचूक निदान व उपचार करण्याचे कौशल्य मिळवले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या रुग्णालयात त्याच कुशलतेने होमिओपॅथिक उपचार सुरू केले व अल्पावधीत रुग्णांमध्ये लोकप्रियता मिळवली. आजही ‘ऑनलाईन कन्सल्टेशन’च्या माध्यमातून अनेक रुग्ण ‘डॉ. रत्नाज् होमिओपॅथी’शी जोडलेले आहेत. ‘डॉ. रत्नाज् होमिओपॅथी’च्या माध्यमातून अनेक गंभीर आजारांवर त्या यशस्वी उपचार करत आहेत. त्वचा-विकारांमधील गंभीर असे ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’, ‘सोरायसिस’, ‘अलोपेशिया एरिएटा’, ‘व्हिटिलिगो’ किंवा कोड व लहान मुलांमधील ‘एडीएचडी’, ‘ऑटिझम’ यांसारखे ‘न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स’; महिलांमधील थायरॉईड व त्यामुळे उद्भवणारी स्थूलता, गुडघेदुखी, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व या आजारांचा समावेश आहे. तसेच अनेक मानसिक आजार, रुग्णाला काहीही करायची इच्छा होत नाही, दैनंदिन आयुष्यातील अनेक आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस वाटत नाही, सतत आत्महत्येचे विचार येतात, एकाग्रतेचा अभाव, सतत निराशा व नकारात्मक विचार येत राहतात, अशा रुग्णांना होमिओपॅथिक उपचार व समुपदेशन करून त्यांना नैराश्यातून बाहेर आणले आहे. कोणत्याही औषधांवर रुग्ण अवलंबून राहू नये, यासाठी त्या प्रयत्नशील असतात. उपचाराच्या ठरावीक काळानंतर त्या स्वतः रुग्णांना खात्रीपूर्वक औषध देणे बंद करतात. त्यामुळे औषधे कायम घ्यावी लागतात, हा गैरसमज त्यांनी रुग्णांच्या मनातून कायमचा दूर केला आहे. होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्याच्या आयुष्यातील मानसिक ताणतणाव व दुःख-अडचणी यांची विचारणा केली जाते. काही रुग्णांना त्या बाबींचा काही संबंध वाटत नाही. आजार शरीरावर आहे आणि प्रश्न मनाचे का विचारले जात आहेत, असा प्रश्न पडतो. मन आणि शरीर कसे जोडलेले आहे आणि त्यातून आजार कसे उद्भवतात, हे समजावून सांगितल्यानंतर रुग्णाच्या जीवनशैलीतही बदल घडून येतो. मानसिक ताण कमी केला; आहार, झोप व व्यायाम व्यवस्थित ठेवले, तर कोणताही आजार उद्भवणार नाही. जर एखादा असाध्य आजार जडला असेल, तर औषधांसोबत सकारात्मक विचारशक्ती ठेवल्यास, रुग्ण कमी काळात आजारातून बाहेर येतो. अशाप्रकारचे मार्गदर्शन सर्व रुग्णांना डॉ. रत्ना करतात. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही त्या कार्यरत असल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांना होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीबाबत व नवनवीन संशोधनाबाबत नेहमीच मार्गदर्शन करत असतात. तसेच निराधार स्त्रिया व त्यांच्या मुलांवर मोफत उपचार सुरुवातीपासूनच त्या करत आहेत. अनेक वृद्धाश्रमांत वृद्धांची तपासणी व उपचार त्यांनी केले. मतिमंद मुलांच्या शाळेत आरोग्य तपासणी व मुलांच्या भविष्यासंदर्भात पालकांचे समुपदेशन त्या करतात. अनेक धर्मदाय दवाखान्यांत रुग्णांना मोफत तपासणी व औषधसेवा दिली आहे. रुग्णाच्या आयुष्यात सकारात्मकता आणून जीवनाकडे व आजारपणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या डॉ. रत्ना चोपडे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!