मुंबई : (Pakistan Nobel Peace Prize Demand) अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामाचे श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. इतकेच नव्हे, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पाकिस्तानच्या विविध स्तरांतून होत आहे. अशातच या दोघांव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीलाही नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.(Pakistan Nobel Peace Prize Demand)
पाकिस्तानातील पंजाब विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावामध्ये परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनाही ‘ग्लोबल पीसमेकर’ म्हणून पुढे केले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब विधानसभेत सादर केलेल्या प्रस्तावात पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार, त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रादेशिक स्थैर्याला बळकटी मिळाली असून जागतिक शांततेला चालना मिळाली आहे. प्रस्तावात असेही नमूद आहे की, या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे एक मोठा संभाव्य संघर्ष टळण्यास मदत झाली.(Pakistan Nobel Peace Prize Demand)
पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे चीफ व्हिप राणा मोहम्मद अरशद यांनी सदनात मांडलेल्या या प्रस्तावात तिन्ही नेत्यांच्या प्रभावी कूटनीतीचे कौतुक करण्यात आले आहे आणि असा दावा करण्यात आला आहे की, त्यांनी अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात वाढत जाणारा तणाव कमी करण्यात तसेच प्रादेशिक शांतता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.(Pakistan Nobel Peace Prize Demand)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\