भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक ब्रीद निधन

    10-Apr-2026
Total Views |

BJP DEEPAK BRID
 
डोंबिवली: (Deepak Brid)नूतन शिक्षण संस्था , बेतूरकर पाडाचे अध्यक्ष व भाजपाचे जुने निष्ठावंत पदाधिकारी दिपक पांडुरंग ब्रीद(Deepak Brid) ह्यांचे मुंबई येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने दि.१०एप्रिल २६ रोजी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी ते ५५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.
 
ब्रीद यांनी नूतन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बेतूरकर पाडा भागात चांगले सामाजिक कार्य उभे केले होते. जेष्ठ संघ प्रचारक बाबा जोशी, रोटरीचे मिलिंद कुलकर्णी, संजय रत्नपारखी, पद्मनाभ जोशी, मदन गरुड व इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी अनेक वर्षे "काळा तलाव महोत्सव" आयोजित केला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक दर्जेदार कार्यक्रम ब्रीद यांनी कल्याणकरांसाठी आयोजित केले होते.(Deepak Brid)
 
हेही वाचा :  विक्रोळीमध्ये बुलेट ट्रेन भुयारीकरणाला वेग
 
एका कार्यक्रमास आताचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत हेही उपस्थित होते. असा विविध काम करणारा व सामाजिक भान असलेला एक उमदा कार्यकर्ता आज आपल्याला सोडून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.(Deepak Brid)