मुंबई :(Mumbai-Ahmedabad Bullet Train) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली असून विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीनच्या जुळणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक पायाभूत सुविधांना नवे बळ मिळणार आहे. याचसोबत भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा खोदण्याच्या दिशेनेही वेगाने वाटचाल सुरू झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train)प्रकल्प अंतर्गत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते सावली (घणसोलीजवळ) दरम्यान 16 किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम टीबीएमच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. एकूण 21 किमी लांबीच्या या टनेलमध्ये देशातील पहिली 7 किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे.(Mumbai-Ahmedabad Bullet Train)
या प्रकल्पात 5 किमी बोगद्याचे न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीने खोदकाम पूर्ण झाले असून उर्वरित 16 किमी बोगदा टीबीएमद्वारे खोदला जाणार आहे. 13.1 मीटर व्यासाची ही सिंगल ट्यूब टनेल जमिनीखाली 25 ते 57 मीटर खोलीवर असून पारसिक टेकडीखाली ती 114 मीटरपर्यंत जाते; जे अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे.(Mumbai-Ahmedabad Bullet Train)
प्रगत TBM मशीनचे वैशिष्ट्य
या प्रकल्पासाठी दोन अत्याधुनिक टीबीएम मशीन वापरण्यात येत आहेत:
TBM-1: 3080 टन
TBM-2: 3184 टन
मिक्स शील्ड/स्लरी तंत्रज्ञानावर (Mumbai-Ahmedabad Bullet Train) आधारित ही मशीन जटिल भूवैज्ञानिक परिस्थितीतही कार्यक्षम आहेत. प्रत्येक मशीन 95.32 मीटर लांबीची असून त्यामध्ये कट्टर हेड, जॉ क्रशर, मुख्य शील्ड आणि चार गँट्री सिस्टम आहेत. ही मशीन 49 मिमी प्रति मिनिट या गतीने सुरक्षित खोदकाम करू शकतात.(Mumbai-Ahmedabad Bullet Train)
TBM-1 विक्रोळीहून BKC कडे, तर TBM-2 सावलीहून विक्रोळीपर्यंत प्रवास करेल.
कास्टिंग यार्ड आणि गुणवत्ता नियंत्रण
ठाणे जिल्ह्यातील महापे येथे 11.17 हेक्टरवर कास्टिंग यार्ड उभारण्यात आले असून 77,000 सेगमेंट्स तयार करून 7,700 रिंग्स बनवल्या जाणार आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे कामात अचूकता आणि गुणवत्ता राखली जात आहे. (Mumbai-Ahmedabad Bullet Train)
सुरक्षिततेवर विशेष भर
टनेलिंगदरम्यान आजूबाजूच्या संरचनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणाली वापरली जात आहे. यात सेटलमेंट पॉइंट्स, टिल्ट मीटर, स्ट्रेन गेज आणि सिस्मोग्राफचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होणार असून देशाच्या पायाभूत विकासात हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
पुढील टप्पे
प्रारंभिक TBM ड्राइव्ह: जुलै 2026
मुख्य टनेलिंग ड्राइव्ह: ऑक्टोबर 2026(Mumbai-Ahmedabad Bullet Train)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.