व्यावसायिक आणि भाजपा नेते मोहित कंबोज यांची कन्या मिश्का कंबोज हिच्या 16व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या खास सोहळ्याला राजकारण आणि सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मिश्का कंबोजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्यात पूर्वी तीव्र वाद पाहायला मिळाला होता. मात्र, या पार्टीत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीचीच सर्वाधिक चर्चा रंगली.
या सोहळ्याला उद्योगपती अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनीही उपस्थिती दर्शवली. अंबानी कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.
बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान यानेही या पार्टीत हजेरी लावली. त्यांच्या फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
तसेच, अभिनेता रणवीर सिंग याने आपल्या गाण्यांवर जबरदस्त लाईव्ह परफाँर्मन्स देत कार्यक्रमात रंगत आणली.