GCC Capital Pune: पुण्याची ‘ जी सी सी कॅपिटल’ बनण्याच्या दिशेने वाटचाल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    08-Mar-2026
Total Views |
 
GCC Capital Pune
 
मुंबई : (GCC Capital Pune) "पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गेल्या वर्षभरात देशात सर्वाधिक जी सी सी स्पेस पुण्यात विकसित झाली असून, त्यामुळे पुणे शहर ‘ जी सी सी कॅपिटल’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (GCC Capital Pune)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे वर्षा निवासस्थान येथून रविवार दि.८ रोजी लोकार्पण (ऑनलाईन) केले. यावेळी अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण असणारा पुल उभारण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीएमआरडीएचे अभिनंदन केले. (GCC Capital Pune)
 
यावेळी पुणे येथून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. (GCC Capital Pune)
 
हेही वाचा: Solar Defence and Aerospace: देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
 
पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या या पुलाच्या कामातील विविध अडचणी दूर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. म्हणून यावेळी या पुलाला स्व. अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक सहमती दर्शवली. (GCC Capital Pune)
 
"पुणे शहरात वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्या संयुक्त सहकार्याने पुण्याच्या एकत्रित नागरी क्षेत्राच्या विकासासाठी एक व्यापक ग्रोथ प्लॅन तयार केला जात आहे. दोन रिंगरोड, मेट्रो नेटवर्क आणि विविध लिंक रोड्स पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने पाठीशी उभे आहे." असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (GCC Capital Pune)
 
"पुढील काळात हे सर्व प्रकल्प पूर्ण होण्याची कालमर्यादा पाच ते सात वर्षांवरून कमी करून अडीच ते तीन वर्षांपर्यंत आणण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे गुंतवणुकीवरील परतावा अधिक प्रभावीपणे मिळेल." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. (GCC Capital Pune)