नागपूर: (Solar Defence and Aerospace) जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवा वर्ल्ड ऑर्डर तयार होत असून व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात आघाडीवर असेल. या दिशेने आपला देश झपाट्याने वाटचाल करत असताना देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य सोलर समूह करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. (Solar Defence and Aerospace)
सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्यावतीने मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, हर्ष नुवाल उपस्थित होते. (Solar Defence and Aerospace)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकेकाळी संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रात कुठलीही स्पष्टता नसताना सोलर समूह या क्षेत्रात कार्य करीत राहिला. आज या समूहाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक ड्रोन असो की, पिनाका रॉकेटसारखे तंत्रज्ञान असो, देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य या समूहाने केले आहे. बदलत्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर परिसंस्था तसेच क्वांटम टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका बजावित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संरक्षण तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि डीपटेक क्षेत्रासाठी नवे धोरण तयार केले. सोलरच्या माध्यमातून या धोरणांतर्गत झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे." (Solar Defence and Aerospace)
राज्य शासनाकडून संपूर्ण सहकार्य
‘राष्ट्रप्रथम’ या विचारातून सोलर इंडस्ट्रीजची वाटचाल सुरु असताना राज्य शासनाकडून त्यांना संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. (Solar Defence and Aerospace)
सोलर इंडस्ट्रीचे योगदान अभिमानास्पद - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
"जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर देश आपली संरक्षणसिद्धता वाढवत आहे आणि विश्वशांतीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. रोबोटीक इंजिन आणि ड्रोनच्या क्षेत्रात मोठी प्रगती होत असून सध्या जगभरात सुरु असलेल्या संघर्षातून त्याची प्रचीती येत आहे. सोलरचा हा प्रकल्प देखील भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळलेला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राची क्षमता लक्षात घेता सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे." (Solar Defence and Aerospace)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....