Sunita Godbole: पद्मश्री सुनिता गोडबोले यांचा सत्कार सोहळा मुंबईत संपन्न

    08-Mar-2026   
Total Views |
 
Sunita Godbole
 
मुंबई : (Sunita Godbole) विद्यार्थी निधी आणि अभाविप पूर्व कार्यकर्ता, आयोजित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सौ. सुनिता गोडबोले यांचा सत्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम शनिवार दि. ७ मार्च रोजी सायं ६.३० वाजता पिपल.एज्यु.सो. इंग्लिश मि. स्कुल, महाराष्ट्र हायस्कुल, एन. एम. काळे मार्ग, गोखले रोड, दादर (पश्चिम) येथे पार पडला. सेवा आणि संवेदनशीलतेने काम करायचे उद्दिष्ट समोर ठेऊन छत्तीसगडच्या बस्तर आणि अन्य भागात आजतागायत काम करत असल्याचे सुनीताताईंनी यावेळी सांगितले. (Sunita Godbole)
 
वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून गेली २६ वर्षे आदिवासींचे आरोग्य, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती आणि आत्मसन्मान यासाठी झटणाऱ्या सौ. सुनिता गोडबोले यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सुनीताताई म्हणाल्या, समाजासाठी, देशासाठी पूर्वीपासून जे कार्य करत आलेत, त्यांच्या या मौल्यवाद योगदानाचा आमचे कार्य घडवण्यात मोठा वाटा आहे. राष्ट्रासाठी कितीतरी पटींनी कष्ट त्यांनी घेतले. व्यक्ती म्हणून अनेकांच्या प्रेरणा वेळोवेळी मिळत गेल्या. विवेक, तरुण भारत यांच्या वाचनामुळे वैचारिक क्षमता वाढत गेली. (Sunita Godbole)
 
होही वाचा: Saree Walkathon 2026: साडी वॉकथॉन २०२६' कार्यक्रमास अमीत साटम यांची भेट  
 
बस्तर येथील अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, लग्नानंतर ६ व्या दिवशीच छत्तीसगडच्या बस्तर येथे डॉ. रामचंद्र गोडबोले यांच्यासह स्थानिक वनवासींमध्ये कार्य सुरू झाले. महिला केंद्र, दवाखाना सुरळीत चालावे यासाठी कार्य हाती घेतले. नक्षलवादी क्षेत्र केंद्रापासून ५-६ किलोमीटर वर. त्या भागात देखील पायी प्रवास करून कार्य केले. तिथल्या स्थानिक रहिवाशांना महिला, लहान मुले यांना वनवासी कल्याण आश्रमशी जोडण्याचे कार्य केले. (Sunita Godbole)
 
आज सरकार छत्तीसगड सारख्या क्षेत्रात विकासकामे करत आहेच; मात्र जंगलामधील जे आदिवासी पाडे आहेत तिथल्या लोकांसाठी, त्यांच्या सुख सुविधांसाठी प्रयत्न करण्याची आज खरी आवश्यकता असल्याचे सुनीता ताईंनी सांगितले. (Sunita Godbole)
 
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर विद्यार्थी निधी न्यास खजिनदार धीरज बोरीकर, विवेकानंद केंद्र महाराष्ट्र गोवा प्रांतचे अभय बापट, सहकार भारती अखिल भारतीय संघटनमंत्री संजय पाचपोर उपस्थित होते. (Sunita Godbole)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक