Saree Walkathon 2026: साडी वॉकथॉन २०२६' कार्यक्रमास अमीत साटम यांची भेट

    08-Mar-2026
Total Views |
 
Saree Walkathon 2026
 
मुंबई : (Saree Walkathon 2026) 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'च्या शुभमुहूर्तावर, उत्तर पश्चिम जिल्हा भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा आणि नगरसेविका सौ. प्रीती सातम यांच्या वतीने आयोजित भव्य 'साडी वॉकथॉन २०२६' मध्ये मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी रविवार दि.८ रोजी उपस्थिती दर्शवली. (Saree Walkathon 2026)
 
"'तिच्या पावलात शक्ती' हे ब्रीदवाक्य आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरले. महिलांचे आरोग्य, उत्साह आणि आपली संस्कृती यांचा हा अनोखा संगम पाहून अभिमान वाटला.अतिशय शिस्तबद्ध आणि भव्य आयोजनाबद्दल प्रीती सातम आणि सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन! (Saree Walkathon 2026)
 
हेही वाचा: Chitra Wagh: एसएनडीटी सारख्या संस्था रोज महिला दिन साजरा करतात : आमदार चित्रा वाघ
 
आमच्या सर्व लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनाच्या पुनश्च मनःपूर्वक शुभेच्छा!" अशी प्रतिक्रिया अमीत साटम यांनी यावेळी दिली. (Saree Walkathon 2026)
 
हजारो माता भगिनींनी पारंपारिक साडी नेसून या वॉकथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. (Saree Walkathon 2026)