Chitra Wagh: एसएनडीटी सारख्या संस्था रोज महिला दिन साजरा करतात : आमदार चित्रा वाघ

    08-Mar-2026
Total Views |

मुंबई : (Chitra Wagh)"अनेकदा आपण महिलादिन हा त्या दिवशीच साजरा करत असतो. शुभेच्छा देतो, कार्यक्रम करतो. मात्र एसएनडीटी सारख्या संस्था गेली १०० वर्षांहून अधिक काळ रोज महिला दिन साजरा करतायत त्याबद्दल समाजाने एसएनडीटी बद्दल समाजाने कृतज्ञ भाव जपण्याची गरज असल्याचे आपल्याला मनापासून वाटते.महिलांना शिक्षण, कौशल्य आणि संधी मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष मदत करणे म्हणजे आपल्या सावित्री माईंचा वसा पुढे नेणे. म्हणजेच खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा करणे आहे ."असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले. (Chitra Wagh)
 
आमदार चित्रा वाघ यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एसएनडीटी महिला विद्यापीठाला भेट दिली. यावेळी कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांची भेट घेतल्यानंतर आणि विद्यापीठाची कार्यपद्धती समजून घेतल्यावर त्या प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. (Chitra Wagh)
 
"आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानेच केवळ महिला विषयक कार्यक्रम आयोजित न करता गेली १०० वर्ष देशाला वेगवेगळ्या क्षेत्रात एक पेक्षा एक दर्जेदार सावित्रीच्या लेकी देणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मागे समाजाने आपली ताकद उभी करायला हवी." असे प्रतिपादन भाजपा महिला अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले. (Chitra Wagh)
 
 
विद्यापीठाच्या या भेटीत वाघ यांनी उज्ज्वला चक्रदेव यांच्याशी संवाद साधताना विद्यापीठात महिलांसाठी राबवले जाणारे अनेक उपक्रम समजून घेतले. विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेला ‘चेतना’ हा उपक्रम खूपच प्रेरणादायी वाटल्याच आमदार वाघ यांनी माध्यमांना सांगितले . ‘चेतना’च्या माध्यमातून महिलांसाठी ४०० पेक्षा जास्त शॉर्ट कोर्सेस उपलब्ध आहेत. पारंपरिक कौशल्यांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत… नथ बनवण्यापासून सायबर अवेअरनेस, ऑफिस ऑटोमेशन, डिजिटल फॉरेन्सिक अशा अनेक क्षेत्रांत महिलांना सक्षम बनवण्याचे काम येथे सुरू आहे. (Chitra Wagh)
 
विद्यापीठात गेल्या १८ वर्र्षात प्राध्यापक भरती करता आलेली नाही. आता मात्र महायुती सरकारच्या काळात देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील सरकारने याबाबतच्या अनेक अडचणी दूर करत प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा केल्याचं चक्रदेव यांनी या भेटीत सांगितलं. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यार्थी चळवळीतील नेतृत्व असल्याने त्यांनी यात जाणीवपूर्वक लक्ष घातलं असल्याचं कुलगुरूंनी स्पष्ट केले. तरीही महिलांसाठी विशेष सेवा सोयी पुरवणाऱ्या या विद्यापीठाला शासकीय पातळीवर काही सहकार्य हवे असल्यास त्यासाठी आपण विनम्रतेने तयार असल्याची ग्वाही आमदार चित्रा वाघ यांनी या भेटीत विद्यापीठाला दिली. (Chitra Wagh)