मुंबई : (Holi Violence) होळीच्या सणादरम्यान पाण्याच्या फुग्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कट्टरपंथींनी एका हिंदू तरुणाची हत्या केल्याची घटना दिल्लीतील उत्तम नगर परिसरात घडली आहे. हस्तसाल पुनर्वसित कॉलनीत घडलेल्या सदर घटनेनंतर पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर परिसरात सांप्रदायिक तणाव निर्माण झाला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण बटोलिया असे २६ वर्षीय पीडित व्यक्तीचे नाव असून त्यांच्या कुटुंबातील ११ वर्षांची मुलगी छतावरून होळी खेळत होती. त्याच वेळी तिने खाली उभ्या असलेल्या आपल्या वडिलांच्या दिशेने पाण्याने भरलेला फुगा फेकला. मात्र तो फुगा रस्त्यावर पडला आणि त्यातील पाणी शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेवर उडाले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ती महिला गैरहिंदू होती. त्यांची माफी मागितली असतानाही कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट आणखी काही जणांना बोलवून घेतले, ज्यामुळे पुढे वाद आणखी वाढला. जमावाने तरुणच्या घरात घुसून कुटुंबीयांवर हल्ला केला, त्यांना कोंडून ठेवले. सुमारे तासाभरानंतर तरुण दुचाकीवरून घरी परतत असताना १५–२० जणांनी त्याला रस्त्यात अडवले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, उपस्थित जमावाने लोखंडी रॉड, विटा, दगड आणि इतर वस्तूंनी तरुणवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणचे काका गंभीर जखमी झाले, तर कुटुंबातील इतर सदस्यही जखमी झाल्याची माहिती आहे. शवविच्छेदन केल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह कुटुंबाकडे सोपवला आणि पोलिस संरक्षणात तरुणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या फरार असलेल्या आरोपी व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा तपास पोलीस करत आहेत.
एका मुस्लिम महिलेच्या कपड्यांवर पाण्याचे दोन थेंब उडाले आणि दगडफेक करणाऱ्या जिहाद्यांनी होळीच्या दिवशीच तरुणला दगडांनी मारहाण करत रस्त्यावरच ठार मारले. शेवटी हे जिहादी असे किती हिंदूंचे बळी घेणार? हिंदू समाज किती काळ हे सहन करणार? याहूनही महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, जर राजधानी इंद्रप्रस्थातील हिंदू समाज या जिहाद्यांविरोधात एकत्र आला नाही आणि दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई करून खुनी व कटकारस्थान रचणाऱ्यांना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले नाही, तर त्यांचे मनोबल असेच वाढत राहील. हिंदूंच्या सुरक्षेसाठी कट्टरपंथीयांविरुद्ध आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असे वाटते की राजधानीतही आता शासनाने ‘योगी मॉडेल’ अवलंबण्याची गरज आहे.
- विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक