नवी दिल्ली : (Ladakh Lieutenant Governor Kavinder Gupta has resigned) पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्या पाठोपाठ लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.(Ladakh Lieutenant Governor Kavinder Gupta has resigned)
१८ जुलै २०२५ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली होती आणि सुमारे नऊ महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांनी पदाचा राजीनामा सादर केला. नियुक्तीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. लडाखचे तिसरे नायब राज्यपाल तसेच या पदावर विराजमान होणारे पहिले राजकारणी म्हणून गुप्ता यांनी इतिहास रचला होता.(Ladakh Lieutenant Governor Kavinder Gupta has resigned)
गुप्ता यांच्या कार्यकाळात लडाखमध्ये प्रादेशिक प्रश्नांवरून आंदोलनांचे वातावरणही निर्माण झाले होते.लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स या संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनांचे नेतृत्व केले होते. या संघटनांची लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देणे, सहाव्या अनुसूचीअंतर्गत घटनात्मक संरक्षण मिळणे तसेच स्थानिक युवकांसाठी स्वतंत्र रोजगार कोटा लागू करणे, अशा प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान, कविंदर गुप्ता यांच्या राजीनाम्यामुळे लडाखच्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Ladakh Lieutenant Governor Kavinder Gupta has resigned)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\