नगरसेवक पदाचे संपूर्ण वेतन आणि भत्ते महापौर निधीसाठी समर्पित; तेजिंदर सिंग तिवाना यांचा महत्वपूर्ण निर्णय

    31-Mar-2026   
Total Views |
Tejinder Singh Tiwana
 
मुंबई : (Tejinder Singh Tiwana) जनसेवेप्रति अटळ बांधिलकी दर्शवत मुंबई महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी व विधी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी आपले संपूर्ण वेतन जनसेवेकरिता महापौर निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तेजिंदर सिंग तिवाना हे बृन्ममुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड ४७ मधून विजयी झाले होते. दरम्यान, त्यांनी आपल्या पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन तसेच विविध समिती बैठकींसाठी मिळणारे सर्व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रितू तावडे यांना निवेदनही सादर केले.
 
हेही वाचा : Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त! कोण आहेत अश्विनी भिडे?
 
तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “जो नगराची सेवा करतो तो नगरसेवक असतो आणि ही सेवा निस्वार्थ भावनेने व्हायला हवी. जनसेवा हा माझ्यासाठी एक संकल्प आहे. लोप्रतिनिधीचे पहिले कर्तव्य म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे. याच भावनेतून मी माझ्या संपूर्ण कार्यकाळातील मानधन आणि सर्व भत्ते महापौर निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम गरजू मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयोगी ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....