Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त! कोण आहेत अश्विनी भिडे?
31-Mar-2026
Total Views |
मुंबई: (Ashwini Bhide) अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका (BMC) च्या पहिल्या महिला आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनात मोठ्या बदलांची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या “डिजिटल फॉर्म्युला”मुळे मुंबईतील विकासकामांचा वेग वाढणार आणि विलंबाला आळा बसणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Ashwini Bhide)
भिडे यांनी राबवलेलं मॉडेल पूर्णपणे डेटा-ड्रिव्हन आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगवर आधारित आहे. या अंतर्गत एक मध्यवर्ती डिजिटल डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे, ज्यामुळे कोस्टल रोड, सांडपाणी प्रकल्प यांसारख्या मोठ्या कामांची प्रगती, अडथळे आणि मनुष्यबळाची माहिती थेट आयुक्तांना मिळणार आहे. ही पद्धत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या मुंबई मेट्रो 3 प्रकल्पात यशस्वी ठरली होती, आणि आता तीच पद्धत BMC मध्ये लागू होणार आहे. (Ashwini Bhide)
भिडे यांच्या योजनेत PMU (Project Monitoring Unit) महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पारंपरिक फाइल-आधारित प्रणालीऐवजी प्रत्यक्ष रिअल-टाइम ट्रॅकिंग केलं जाणार आहे. कोविड-19 काळात BMC ने वापरलेल्या डेली डॅशबोर्डसारख्या उपक्रमांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली होती. त्याच अनुभवाचा वापर करून आता प्रशासन अधिक पारदर्शक आणि जलद करण्यावर भर दिला जात आहे. (Ashwini Bhide)
BMC च्या बजेट खर्चाचे ऑडिट आणि देखरेख करण्यासाठी अत्याधुनिक ई-गव्हर्नन्स प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यासोबतच मुंबई “स्मार्ट सिटी”च्या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करेल. भिडे यांच्या IT-केंद्रित कामकाजाची झलक यापूर्वी MMRDA आणि मेट्रो प्रकल्पांमध्ये पाहायला मिळाली आहे. (Ashwini Bhide)
कोण आहेत अश्विनी भिडे?
अश्विनी भिडे या महाराष्ट्र कॅडरच्या १९९५ बॅचच्या IAS अधिकारी असून, त्यांच्या कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित कामकाजामुळे त्या प्रशासनात विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यांना 'मेट्रो वुमेन' म्हणून ओळखलं जातं, कारण मुंबई मेट्रो 3 (अक्वा लाईन) प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरही कार्यरत होत्या. त्यांची ओळख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी म्हणूनही केली जाते. (Ashwini Bhide)
प्रशासकीय कारकीर्द...
भिडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेत प्रमुख जबाबदाऱ्या, एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त, राज्याच्या शिक्षण विभागात सचिव अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत त्यांनी प्रशासनात ठसा उमटवला आहे. (Ashwini Bhide)
त्यांच्या कामकाजाची वैशिष्ट्ये म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची क्षमता, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासन यामुळेच त्या आज महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी महिला IAS अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. (Ashwini Bhide)