Ashok Kharat Case: ५ लाखांत ‘आउटडोअर दर्शन’, ९० लाखांची कारही घेतली! भोंदू अशोक खरातचे...

Total Views |
 
Ashok Kharat Case
 
नाशिक: (Ashok Kharat Case) नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच धक्कादायक वळण घेत आहे. तपासात समोर येणारे खुलासे पाहता, भक्तांच्या आस्थेचा कसा गैरफायदा घेतला गेला याचं भयावह चित्र स्पष्ट होत आहे. (Ashok Kharat Case)
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, खरातकडे येणारे भक्त त्याला आपल्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा फार्महाऊसवर घेऊन जाण्यासाठी उत्सुक असत. मात्र या ‘आउटडोअर व्हिजिट’साठी तो तब्बल ५ लाखांपर्यंत शुल्क आकारत असल्याची चर्चा आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तर त्याच्यासाठी पहाटेपासून महागड्या गाड्यांची रांग लागत असे. मात्र, जो जास्त पैसे देईल त्यालाच खरात भेट देत असे. (Ashok Kharat Case)
 
एसआयटीच्या तपासात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. पुण्यातील एका करोडपती भक्ताला पूजा करण्यासाठी वाहन हवे असल्याचे सांगून खरातने तब्बल ९० लाखांची आलिशान कार खरेदी करायला लावली. धक्कादायक बाब म्हणजे नंतर हीच कार त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली. भोंदू खरातच्या कार्यालयात अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ‘दरबार’ भरत असे. हा दरबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. (Ashok Kharat Case)
 
दरम्यान, या प्रकरणात आता अंधश्रद्धेविरोधी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. काही अंधभक्तांनी आता गंभीर आरोप करत म्हटले आहे की, खरातने कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिर येथे दोन वर्षांपूर्वी चक्क ‘नाग प्रगट’ केल्याचा दावा केला होता. मंदिरात पूजा करताना खरातने ट्रस्टींना डोळे मिटायला सांगितले आणि काही वेळानंतर डोळे उघडताच नाग देवता प्रगट झाल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे उपस्थित सर्वजण घाबरून गेले होते. या सर्व प्रकारावरून आता भोंदू अशोक खरात आणि संबंधित ट्रस्टींवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Ashok Kharat Case)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com