Air India : विमानाच्या केबिनमधून धूर, वैमानिकाचा 'Mayday' कॉल; एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!

    31-Mar-2026   
Total Views |

Air India

मुंबई : (Air India Express Emergency Landing In Lucknow)
पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हे लँडिंग केल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकाने प्रसंगावधान राखत लखनौ विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला.(Air India Express Emergency Landing In Lucknow)

नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, एअर इंडियाचे 'IX 1523' हे विमान सोमवारी ३० मार्च रोजी बागडोगरा येथून दिल्लीसाठी झेपावले होते. उड्डाणानंतर संध्याकाळी ५ च्या सुमारास हे विमान उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यावर ३६ हजार फूट उंचीवर असताना, वैमानिकाला केबिनमधील एव्हिओनिक पॅनलमधून धूर निघताना दिसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तातडीने लखनौ एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली आणि 'मेडे कॉल' देऊन आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. मेडे कॉल केल्यानंतर प्रवाशांना ऑक्सिजन मास्क उपलब्ध करून देण्यात आले. लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंगची परवानगी घेऊन, सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तेव्हापासून विमान लखनऊच्या टर्मिनल-3 वरच उभे आहे.(Air India Express Emergency Landing In Lucknow)
 
विमानात १४८ प्रवाशांसह क्रू मेंबर्स होते, जे सर्वजण सुखरूप आहेत. अनेक प्रवाशांना दुसऱ्या विमानांनी दिल्लीला पाठवण्यात आले, तर काहींना हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे. सुरक्षा आणि तांत्रिक पथके विमानात तपासणी करत आहेत. प्राथमिक तपासणीत धूर किंवा आगीचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही.(Air India Express Emergency Landing In Lucknow)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\