मुंबई : (Israel Knesset approves Death Penalty for Palestinians) इस्रायलच्या संसदेने (नेसेट) सोमवारी ३० मार्च रोजी एका मोठ्या विधेयकाला मंजुरी दिली असून, यानुसार प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात दोषी आढळणाऱ्या वेस्ट बँक येथील पॅलेस्टिनी गुन्हेगारांना आता थेट फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. ६२ विरुद्ध ४८ अशा मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले असून, यामुळे जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (Israel Knesset approves Death Penalty for Palestinians)
यात अपील करण्याचाही कोणताही अधिकार नसेल. शिक्षा सुनावल्यापासून ९० दिवसांच्या आत फाशी दिली जाईल. हा कायदा राष्ट्रवादी किंवा दहशतवादी हेतूने केलेल्या हत्यांना लागू होईल. तथापि, न्यायालयाला विशेष कारणांखाली जन्मठेपेची शिक्षा देण्याचाही अधिकार असेल. (Israel Knesset approves Death Penalty for Palestinians)
इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन गिवीर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, "आज पीडितांसाठी खऱ्या अर्थाने न्यायाचा दिवस आहे. दहशतवाद्यांसाठी आता कोणतीही पळवाट उरलेली नाही. जो कोणी दहशतवादाची वाट निवडेल, तो स्वतःसाठी मृत्यूची निवड करेल, हा स्पष्ट संदेश आम्ही या कायद्याद्वारे दिला आहे." बेन गिवीर यांनी यापूर्वी धमकी दिली होती की, जर विधेयकावर मतदान झाले नाही तर त्यांचा पक्ष सरकारमधून पाठिंबा काढून घेईल. (Israel Knesset approves Death Penalty for Palestinians)
विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच या विधेयकाविरोधात इस्रायलच्या नागरी हक्क संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर ते असंवैधानिक असल्याचे सांगत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वी या विधेयकाला विरोध केला होता, परंतु गाझा युद्धविराम लागू झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि अंतिम मतदानासाठी स्वतः उपस्थित राहून या कायद्याच्या बाजूने मतदान केले. (Israel Knesset approves Death Penalty for Palestinians)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\