मुंबई : (India's ATF Supply) देशात विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुढील ६० दिवस कोणत्याही अडथळ्याविना पुरवठा सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी राज्यसभेत दिली.
गेल्या १२ वर्षांत विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती
मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे गेल्या १२ वर्षांत देशातील विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. विमानतळांची संख्या, विमानांची संख्या आणि प्रवासी यामध्ये गेल्या दशकात दुपटीने वाढ झाली आहे. या वाढीमुळे विमान वाहतूक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. यासाठी सरकारकडून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले जात असून, येणाऱ्या काळात या क्षेत्रात अधिक रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
आपत्कालीन लँडिंगमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य
आपत्कालीन लँडिंगच्या सुरक्षिततेसंदर्भात बोलताना नायडू यांनी राज्यसभेत सांगितले की, "आपत्कालीन किंवा प्राधान्याने लँडिंग करण्याचा निर्णय पूर्णपणे सुरक्षिततेच्या विचारांवर आधारित असतो. विमानाचा प्रकार, हवामानाची परिस्थिती आणि हवाई क्षेत्रातील इतर विमानांची स्थिती यांवर अवलंबून, लँडिंग करण्यापूर्वी सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\